Astrology Panchang 04 November 2024 : आज सोमवार, 4 नोव्हेंबर रोजी चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करणार असून चंद्र सूर्यापासून दुसऱ्या भावात असल्यामुळे वेशी योग तयार होत आहे. याशिवाय आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असून या दिवशी वेशी योगासोबत सर्वार्थ सिद्धी योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात आज उत्साह दिसेल आणि आरोग्य उत्तम राहिल्याने ठणठणीत दिसाल. जर तुम्हाला आज गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला आज शुभ योगाचा लाभ मिळेल, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगला परतावा मिळेल. जर तुम्ही न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकले असाल तर आज तुम्हाला या प्रकरणांमध्ये दिलासा मिळेल. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी ऐकायला मिळेल.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नशिबाच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. सिंह राशीचे लोक आज प्रत्येक काम पूर्ण करू शकतील. या राशीचे लोक ज्यांना नोकरी, प्रवास किंवा शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्यांची इच्छा आज पूर्ण होणार आहे. नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला पैसे कमवण्याचे नवीन मार्ग सापडतील आणि तुम्हाला काही मालमत्ता आणि जमिनीत गुंतवणूक करण्याची चांगली संधीही मिळेल. आज दुकानदार आणि व्यावसायिकांच्या विक्रीत चांगली वाढ होईल आणि त्यांना व्यवसायाचा विस्तारही करता येईल. 


वृश्चिक रास (Scorpio)


आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आशेचा नवीन किरण घेऊन येणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना महादेवाच्या कृपेने आज अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि ज्या कामांची तुम्हाला खूप दिवसांपासून चिंता सतावत ती देखील पूर्ण होताना दिसत आहेत. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस चांगला जाईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज शिक्षणात चांगले परिणाम मिळतील. नोकरी करणारे आज चांगल्या पगारासाठी दुसऱ्या कंपनीत मुलाखतीसाठी जाऊ शकतात, जिथे त्यांना यश मिळेल. 


मकर रास (Capricorn)


आजचा दिवस यशाचा आहे. मकर राशीच्या लोकांना आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल, त्यामुळे तुमची अनेक अपूर्ण कामं पूर्ण होतील आणि तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. एखाद्या कौटुंबिक सदस्याचं लग्न आज निश्चित होऊ शकतं, ज्यामुळे कुटुंबात आनंद दिसेल. आज काम करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळेल आणि ते स्वतःची ओळख निर्माण करू शकतील. व्यावसायिक चांगला नफा कमवू शकतील. परिश्रमानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. तुम्ही संध्याकाळ कुटुंबातील सदस्यांसोबत विनोदात घालवाल आणि वडिलोपार्जित मालमत्तेबाबतही चर्चा होऊ शकते.


मीन रास (Pisces)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. मीन राशीच्या लोकांना आज त्यांच्या मुलाच्या करिअरशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमच्या मनावरील काही ओझेही हलके होईल. आज तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्याने आनंद होईल आणि ऑनलाइन शॉपिंग देखील करता येईल. संध्याकाळी मित्रांसोबत हँग आउट करताना तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल, जी तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 04 November 2024 : आज सोमवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य