Astrology Panchang 04 February 2025 : आज मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी मंगळ मिथुन राशीत आहे, जो धन योगाची निर्मिती करत आहे. यासोबतच, आज मंगळवारी माघ महिन्यातील सप्तमी म्हणजेच रथ सप्तमीचा योग आहे, ज्याचा स्वामी सूर्य आहे आणि यामुळे बुधादित्य राजयोग देखील निर्माण होत आहे. या योगांमुळे आजचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा असणार आहे. या लकी राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांना आज त्यांच्या नशिबाचा पूर्ण फायदा होईल. तुम्हाला दानधर्म आणि धार्मिक कार्यातही रस असेल, ज्यामुळे आज तुम्हाला पुण्य लाभेल. तुम्ही आज गुंतवणूक करून पैसेही कमवू शकता. जर तुम्ही कोर्ट केसमध्ये अडकला असाल तर आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. आज तुमच्या उत्पन्नाचे स्रोतही वाढतील आणि तुम्हाला अशा क्षेत्रांमधून आर्थिक लाभ मिळतील, जिथून तुम्ही अपेक्षाही केली नसेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा, त्यांच्याकडून तुम्हाला प्रोत्साहन मिळू शकेल. तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम कायम राहील.

कन्या रास (Virgo)

आज कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या मागील कर्मांचं फळ मिळणार आहे. शैक्षणिक स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आज त्यांच्या मेहनतीचा पूर्ण फायदा मिळेल. जे लोक अकाउंट्स आणि विमा क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस कमाईच्या बाबतीत चांगला असेल. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. कला आणि संगीत क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी आजचा दिवस शुभ असेल. शिक्षणासाठी परदेश प्रवास करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील.

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी आज 4 जानेवारीचा दिवस कामाच्या दृष्टीने चांगला असेल. आज तुम्हाला सरकारी क्षेत्रातील कामात यश मिळेल. आज कपडे आणि वाहनांशी संबंधित कामात तुम्हाला विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुमच्या वडिलांना कुठूनतरी काही फायदा होईल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. जे नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आज नशीब साथ देईल. आजची संध्याकाळ व्यवसायात मकर राशीसाठी विशेष फायदेशीर ठरेल. आज कुटुंबात सुखद वातावरण असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार, होणार अपार धनवृष्टी