Astrology Panchang 02 September 2024 : आज सोमवार, 2 सप्टेंबर रोजी चंद्र सूर्याच्या सिंह राशीत भ्रमण करणार आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असून ही तिथी सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवयोग, सिद्ध योग आणि मघा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल आणि त्यांना सकाळी चांगली बातमी मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती साधू शकाल आणि अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने तुम्हाला दिलासा मिळेल. सासरच्या लोकांमध्ये काही गैरसमज चालू असतील तर ते आज संपुष्टात येतील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. 


कर्क रास (Cancer)


आजचा दिवस कर्क राशीसाठी चांगला असेल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. जर तुम्ही आज कुठेतरी पैसे गुंतवले तर तुम्हाला भविष्यात दुप्पट नफा मिळेल, ज्यामुळे तुमची भविष्याची चिंता कमी होईल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभाग घेतल्याने लोकप्रियता आणि आदर वाढेल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील आणि नफाही होईल. तुम्हाला प्रत्येक पावलावर भावा-बहिणीची मदत मिळेल, ज्यामुळे घरातील कामं सहज पूर्ण होतील आणि कुटुंबातील सर्व सदस्यांमधील संबंधही चांगले राहतील.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. कन्या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा आज महादेवाच्या कृपेने पूर्ण होतील. तुम्हाला संपत्ती आणि वाहन सुख मिळण्याचीही शक्यता आहे. आर्थिक दृष्टीकोनातून दिवस चांगला जाईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना आज दुसऱ्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. कुटुंबात काही तणाव किंवा गैरसमज चालू असतील तर ते आज दूर होतील आणि सर्व सदस्य एकमेकांना कामात मदत करण्यासाठी पुढे येतील.


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना भगवान शंकराच्या कृपेने आज अचानक मोठी रक्कम मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिक आज दिवसभर ग्राहकांमध्ये व्यस्त राहतील आणि त्यांना उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. तुमचं एखादं काम खूप दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते तुमच्या भावांच्या मदतीने सहज पूर्ण होईल. तसेच या राशीचे लोक ज्यांना परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. 


मीन रास (Pisces)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. मीन राशीचे लोक आज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकतात आणि त्यांना त्यांच्या मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमचा तुमच्या भावांसोबत काही वाद होत असेल तर तो आज संपेल आणि सर्व प्रकारचे गैरसमजही दूर होतील. नोकरी करणाऱ्यांना आज त्यांच्या सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे ते कार्यालयीन कामे वेळेवर पूर्ण करतील आणि मजेदार मूडमध्ये दिसतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 02 September 2024 : आज सोमवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य