Astrology News : आवळ्याचं झाड जंगलाशिवाय अनेकांच्या घरातही पाहायला मिळतं. हिंदू धर्मात या झाडाचं फार महत्त्व आहे. आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. हिंदू धर्म मान्यतेनुसार, आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो. आवळ्याच्या (Amla) झाडामुळे घरात समृद्धी येते. तसेच, वास्तूशास्त्रानुसार, घरात सकारात्मक ऊर्जा येते. 


आवळ्याचं झाड फळ तर देतेच. हे फक्त झाड नाही तर यात अनेक औषधी गुणधर्मसुद्धा असतात. जे अधिक पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असतात. आवळ्याच्या झाडाचं धार्मिक महत्त्व देखील भरपूर आहे. असं म्हणतात की, आवळ्याचं झाड सर्व संकटांना दूर करण्यास मदत करतात. 


घरात लावा आवळ्याचं झाड 


हिंदू धर्मात आवळ्याच्या झाडाचं फार धार्मिक महत्त्व आहे. शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी आवळ्याचं झाड लावणं फार शुभ मानलं जातं. एकादशीला भगवान विष्णूचा दिवस मानला जातो. या दिवशी आवळ्याच्या झाडावर सात वेळा कलव बांधल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात.


आवळ्याचे औषधी गुणधर्म 


केसांच्या समस्येवर रामबाण उपाय 


आवळ्याचं मिश्रण केसांना लावल्याने केसगळतीची समस्या दूर होऊ शकते. आवळा आणि शिकेकाईचा काढा बनवून तो केसांवर लावल्याने केस मजबूत होतात. 


डोळ्यांच्या समस्येवर आराम 


आवळ्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. हे खाल्ल्याने आपली नजर ठीक राहते. 


बद्धकोष्ठतेवर फायदेशीर 


तुमच्या खाण्या-पिण्याच्या समस्येवर नियंत्रण ठेवलं नाही तर त्याचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी त्रिफळा चूर्ण उकळत्या पाण्यासह त्याचं सेवन करा. तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येवर लवकर आराम मिळेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


July Planet Transit 2024 : गुड न्यूज! कर्क राशीत जुळून येणार अद्भूत युतीचा खेळ, 'या' 3 राशींना अचानक होणार धनलाभ, सुख-समृद्धीत होणार भरभराट