Astrology: आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहतो, जे इतके साधेभोळे असतात, की कोणाच्याही जाळ्यात ते सहज अडकतात, ज्या गोष्टी खऱ्या वाटतात त्यावर विश्वास ठेवतात. ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशी इतरांपेक्षा जास्त भोळ्या असतात. ज्योतिषशास्त्राच्या मदतीने, राशीच्या आधारे लोकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि गुणवत्तेबद्दल सहजपणे जाणून घेता येते. आज आपण प्रेमात नेहमी फसणाऱ्या, अगदी साध्या भोळ्या राशी कोणत्या असतात? हे जाणून घेऊया, ज्याचे डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विश्लेषण खाली दिले आहे. या राशींच्या व्यक्ती प्रेमात खूप भावना प्रधान असतात, त्यांना खरं प्रेम हवं असतं, पण दुसऱ्यांचे खरे हेतू ओळखण्यात कमी पडतात. आज या लेखाद्वारे आपण जाणून घेऊया की कोणत्या राशींना विश्वासाच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.
मीन (Pisces)
भोळेपणा: मीन राशीचे लोक स्वप्नाळू, भावनाशील व खूप दयाळू असतात.प्रेमात फसण्याची शक्यता: ते प्रेमात इतके गुंततात की समोरचा खोटा असला तरी त्याला संधी देत राहतात.फायदा घेणारे लोक: त्यांचा भावनिक स्वभाव आणि सहानुभूतीची भावना लोक त्यांच्या विरुद्ध वापरतात.
कर्क (Cancer)
भोळेपणा: हे लोक प्रेमासाठी फार समर्पित असतात, घर व नात्यांना महत्त्व देतात.प्रेमात फसण्याची शक्यता: एकदा प्रेम केल्यावर ते पूर्णपणे झुकतात, आणि जरी दुसरा फसवणूक करत असला तरी ते माफ करत राहतात.फायदा घेणारे लोक: त्यांची काळजी घेण्याची वृत्ती त्यांच्याच विरोधात वापरली जाते.
वृषभ (Taurus)
भोळेपणा: विश्वासू, स्थिर, प्रेमळ आणि नात्यांमध्ये टिकाव ठेवणारे.प्रेमात फसण्याची शक्यता: खूप वेळा ते चुकीच्या माणसावर विश्वास ठेवतात आणि खूप उशीर होईपर्यंत नातं तोडत नाहीत.फायदा घेणारे लोक: त्यांचा संयम आणि चिकाटी वापरून काही लोक त्यांच्या प्रेमाची गैरफायदा घेतात.
कन्या (Virgo)
भोळेपणा: कन्या राशीचे लोक व्यवस्थित, प्रेमळ पण थोडेसे स्वतःच्या भावना लपवणारे असतात.प्रेमात फसण्याची शक्यता: ते प्रेमात पडल्यावर दुसऱ्याला मदत करत राहतात, स्वतःला मागे टाकतात. समोरचा कितीही स्वार्थी असो, त्यांना एक आशा असते की गोष्टी सुधारतील.फायदा घेणारे लोक: त्यांच्या सेवाभावी स्वभावाचा लोक फायदा घेतात.
हेही वाचा :