Shani Dev : हिंदू पंचांगानुसार, नवीन वर्ष 2023 मध्ये काही राशींवर शनीच्या साडेसातीचा (Shani Sadesati) वाईट परिणाम होणार आहे. 17 जानेवारी 2023 रोजी शनि कुंभ राशीत प्रवेश करेल. मीन राशीवर शनिची साडेसाती त्यांच्या प्रवेशाने सुरू होईल. यासह कुंभ राशीत साडेसातीचे दुसरे पर्व सुरू होईल. त्याचबरोबर मकर राशीत शनिची तृतीया साडेसाती सुरू आहे. अशा स्थितीत कुंभ राशीत शनीच्या संक्रमणामुळे या तीन राशींवर शनि साडेसातीचा प्रभाव सन 2023 मध्ये स्पष्टपणे दिसून येईल.



काय असते शनीची साडेसाती?
शनीची साडेसाती म्हणजे साडेसात वर्षांचा कालावधी. शनिला 12 राशींमधून प्रवास करण्यासाठी 30 वर्षे लागतात, म्हणजेच शनि एका राशीत अडीच वर्षे राहतात. "जेव्हा जन्म राशीतून शनिचे संक्रमण 12 व्या भावात म्हणजेच कुंडलीतील चंद्र राशीतून सुरू होते, तेव्हापासून त्या राशीवर साडेसाती सुरू होते" ज्योतिषशास्त्रानुसार, जन्मपत्रिकेतील चंद्रापासून जेव्हा शनि आठव्या भावात प्रवेश करतात, तेव्हा त्याला छोटी साडे सती म्हणतात. याशिवाय शनि ग्रह व्यक्तीच्या कुंडलीतील पहिल्या, द्वितीय, बाराव्या आणि जन्माच्या चंद्रावरून जातो, तेव्हा सुद्धा शनीची साडेसाती राहते. असतात.


2023 मध्ये शनीची साडेसाती आणि ढैय्या कोणत्या राशीत आहेत?


हिंदू पंचागानुसार, शनि 17 जानेवारी 2023 रोजी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. यामुळे मकर, कुंभ आणि मीन राशीवर साडेसातीचा प्रभाव दिसून येईल. तर, धनु राशीला साडेसातीपासून मुक्ती मिळेल. कर्क आणि वृश्चिक राशीचे लोक शनिची ढैय्या सुरू होईल, मिथुन आणि तूळ राशीचे लोक शनि ढैय्याच्या प्रभावापासून मुक्त होतील.


साडेसातीचा प्रभाव टाळण्यासाठी चुकूनही 'हे' काम करू नका


-खोटे बोलू नका आणि कोणाचीही फसवणूक करू नका.
-पैशाचा आणि आपल्या पदाचा दुरुपयोग करून इतरांचे नुकसान करू नका.
-निसर्गाची हानी करू नका.
-गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना मदत करा
-गरीब मुलींच्या लग्नात सहकार्य करा.
-गरीब आणि कष्टकरी लोकांचा आदर करा.
-नियम आणि शिस्त पाळा. शनि मंत्रांचा जप करा.
-शनिवारी शनि मंदिरात शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा
-शनि चालिसाचे पठण करा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


संबंधित बातम्या


Astrology : 'या' राशीचे लोक पैशाच्या बाबतीत असतात भाग्यवान! कधीही नसते संपत्तीची कमतरता