Dhanteras 2022 : हिंदू पंचागानुसार, धनत्रयोदशी (Dhanteras 2022) दरवर्षी कार्तिक कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते. यावर्षी 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी होणार आहे. धनत्रयोदशीचा सण सोने-चांदी आणि भांडी खरेदीसाठी खास आहे. यासोबतच लोक या दिवशी झाडूही खरेदी करतात. धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे (Goddess lakshmi) प्रतीक आहे. त्यामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी लोक झाडू खरेदी करतात. धनत्रयोदशीला झाडू खरेदी आणि महत्त्व काय आहे ते जाणून घ्या
धनत्रयोदशीला झाडू खरेदी का करतात?
धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीला खरेदी केलेल्या वस्तू तेरा पटींनी वाढतात. या दिवशी झाडू खरेदी करण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते, अशी पौराणिक मान्यता आहे. पौराणिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. घरामध्ये झाडूला पाय लागला तर ते अशुभ मानले जाते. यामुळेच घर झाडून घेतल्यानंतर पायाला स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी ठेवला जातो.
सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतीक
मान्यतेनुसार झाडू हे सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. असे मानले जाते की, झाडू घरातील गरिबी दूर करते. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडूने घर झाडून घेतल्याने कुटुंबात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. असे म्हणतात की, धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते. यामुळेच धनत्रयोदशीच्या दिवशी लोक बाजारातून नवीन झाडू खरेदी करतात आणि घरी आणून स्वच्छ करतात.
झाडूशी संबंधित विशेष वास्तु नियम
झाडू नेहमी घरातील सर्वांच्या नजरेपासून लपवून ठेवला जातो.
वास्तूनुसार रात्री मुख्य दारावर झाडू ठेवल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते.
उभ्या भिंतीवर झाडू कधीही ठेवू नका, जमिनीवर झाडू ठेवणे नेहमीच शुभ असते.
चुकून झाडूला पाय लागल्यास माता लक्ष्मीची माफी मागावी, अन्यथा माता लक्ष्मी रागावते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या
Dhanteras 2022: धनत्रयोदशीच्या दिवशी 'या' चुका करू नका, नाहीतर वर्षभर आर्थिक चणचण भासेल