Astrology: वैदिक पंचागानुसार, आज सोमवार, 23 जून 2025 आहे. आजचा हा दिवस खूप महत्वाचा मानला जातोय, कारण आज प्रदोष व्रत आहे. मासिक शिवरात्र आहे आणि त्यासोबत धृति योग ही बनतो आहे. ज्यामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक मोठे बदल घडणार आहेत. जाणून घ्या या योगाचे महत्त्व आणि आजच्या भाग्यशाली राशींबद्दल..
आजचे विशेष योग - 23 जून 2025
- प्रदोष व्रत (सोमप्रदोष)
- मासिक शिवरात्र
- धृति योग
प्रदोष व्रताचे महत्व:
- शिवाची कृपा मिळते
- आरोग्य, आयुष्य वाढते
- मानसिक शांती मिळते
- संकटातून मुक्ती मिळते
- विशेषतः सोमप्रदोष असल्याने आरोग्यावर प्रभाव चांगला असतो.
मासिक शिवरात्रचे महत्व:
- मनोकामना पूर्ण होतात
- विवाह व संतानप्राप्तीसाठी शुभ
- शिवलिंगावर जलाभिषेक, बेलपत्र अर्पण केल्यास विशेष फल मिळते.
धृति योगाचे महत्व:
- स्थैर्य, सकारात्मक विचार, धैर्य वाढते
- मनोकामना पूर्ण होण्यासाठी योग्य
- नवीन कार्यारंभ, गुंतवणूक यासाठी उत्तम
- विवाह, सौंदर्य उपचार, वास्तू काम यासाठी अनुकूल
सर्वांसाठी खास उपाय:
- संध्याकाळी प्रदोष काळात शिवलिंगासमोर दीप लावा.
- ॐ नमः शिवाय चा जप कमीत कमी 108 वेळा करा.
- बेलपत्र, दुध, मध, गंगाजल अर्पण करा.
आजच्या भाग्यशाली राशी
आजचा हा शुभ दिवस सर्व राशींसाठी काही ना काही चांगले घेऊन आला आहे. विशेषतः कर्क, मीन, वृषभ, सिंह आणि कन्या राशींसाठी अधिक शुभता आहे.
-डॉ भूषण ज्योतिर्विद
हेही वाचा :
आजची 23 जून तारीख अद्भूत! अखेर संघर्ष संपला,'या' 5 राशींचं सौभाग्य सुरू झालं; आयुष्यात येणार मोठा टर्निंग पॉईंट
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)