Astrology : आजचा दिवस शुक्रवार. या दिवसाला अनेक अर्थांनी महत्त्व आलं आहे. वृषभ राशीत गुरु (Jupiter) आणि मंगळ ग्रह एकत्र असल्या कारणाने गुरु-मंगळ योगाची (Yog) निर्मिती झाली आहे. त्याचबरोबर आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी असल्यामुळे गुरु मंगळ योगासह रवि योग, ऐन्द्र योग आणि मूळ नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. 


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवसाचा पाच राशींना चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे या पाच लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी फार शुभ ठरणार आहे. आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात मित्राचं सहकार्य मिळेल. तुमचं आरोग्य अगदी उत्तम असणार आहे. जर तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करायची असेल किंवा एखादी प्रॉपर्टी विकायची असेल तर त्यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. उच्च शिक्षणासाठी तुम्हाला परदेशी जाण्याची संधी देखील मिळू शकते. या संधीचा तुम्ही चांगला फायदा घ्या. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना लवकरच शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. आज सामाजिक तसेच धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल. काही खास लोकांशी भेटीगाठी होतील. तसेच, जे तरूण स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्यांना चांगलं यश मिळेल. व्यापारी वर्गातील लोकांच्या सर्व अडचणी हळूहळू संपतील. जोडीदाराचा प्रत्येक कार्यात तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार अनुकूल असणार आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून तुम्हाला चांगली शुभवार्ता मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्या काराने तुमच्या बॅंक बॅलेन्समध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांना आपल्या कष्टाचं फळ मिळेल. एकंदरीतच आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. पैसे कमावण्याबरोबर धन-संपत्तीची बचत करणं देखील तुम्ही शिकणं गरजेचं आहे. यामुळे तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असेल. व्यापारी वर्गातील लोकांना व्यवसायात चांगला लाभ मिळेल. कामाच्या नवीन ऑर्डर्स येत राहतील. तसेच, आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास, तुमचं आरोग्य अगदी उत्तम असणार आहे फक्त बाहेरचे तेलकट पदार्थ खाऊ नका.  


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक परिणाम देणारा असेल. वडिलांची सेवा केल्याचं पुण्य फळ तुम्हाला पदोपदी मिळेल. जर तुम्हाला एखादी गुंतवणूक करायची असेल तर त्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची जी रखडलेली कामे होती ती या निमित्ताने दूर होतील. त्यामुळे तुम्ही प्रसन्न असाल. जोडीदाराची आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला चांगली साथ मिळेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Horoscope Today 19 July 2024 : आजचा शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य