Astrology : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, दोन दिवसांनंतर अत्यंत शुभ राजयोगाची (Rajyog) निर्मिती होणार आहे.19 मे रोजी शुक्र ग्रहाचं संक्रमण आपली रास म्हणजेच वृषभ राशीत (Taurus Horoscope) प्रवेश करणार आहे. 1 मे रोजी देवगुरु बृहस्पतिने वृषभ राशीत प्रवेश केला होता. पुढच्या एक वर्षांपर्यंत ते याच राशीत स्थित असणार आहेत. अशा प्रकारे शुक्र संक्रमणामुळे वृषभ राशीत गुरु आणि शुक्राचा संयोग तयार होईल.
बृहस्पति आणि शुक्र यांच्या संयोगाने गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग ज्योतिष शास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो. या राजयोगामुळे 4 राशींच्या लोकांना याचा लाभ मिळणार आहे. या लोकांच्या नोकरीत पदोन्नती होऊ शकते. तसेच, व्यवसायात बढती मिळू शकते. नेमक्या कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी योग फारच शुभ परिणाम देणारा आहे. या दरम्यान तुमचं तुमच्या वाणीवर नियंत्रण असणार आहे. तुमचा स्वभाव शांत असणार आहे. लोक तुमच्या वागण्याने इम्प्रेस होऊ शकतात. तसेच, तुम्हाला धनलाभाचीही चांगली संधी मिळणार आहे. तुमचा व्यवहार सुरळीत चालेल. तसेच, बऱ्याच दिवसांपासून अडकलेले तुमचे पैसे देखील तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गासाठी हा काळ चांगला आहे. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीत गुरु आणि शुक्र यांच्या युतीने गजलक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. या दरम्यान तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्याची पुरेपूर शक्यता आहे. जे अविवाहित आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी राजयोग फार अनुकूल असणार आहे. तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळेल. तसेच, अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचं मार्गदर्शन मिळू शकतं. ज्यामुळे तुम्हाला खूप लाभ मिळेल. तुमचं जोडीदाराबरोबरचं नातं अधिक खुलेल. आर्थिक लाभ मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
गजलक्ष्मी राजयोगाने कुंभ राशीच्या लोकांनाही याचा लाभ मिळणार आहे. तुमच्या जीवनात सुख-समृद्धीत वाढ होईल. तुमच्या धन-संपत्तीत वाढ होईल. तसेच, मिळालेले पैसेही तुम्ही योग्य ठिकाणी खर्च कराल. या दरम्यान तुम्ही वाहन खरेदी करू शकता. तसेच, तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: