Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या संक्रमणानंतर तो ग्रह शुभ परिणाम होणार की अशुभ? याचा शोध अनेक संकतांमधून लागतो. जर हे संकेत मिळाले तर लगेच त्यापासून सुटका करण्याचे उपाय शोधले पाहिजेत. विशेषत: राहू (Rahu) ग्रह असेल तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. जर तुमच्या कुंडलीत राहू अशुभ असेल तर याचा तुमच्या घरावर आणि वैवाहिक जीवनावर परिणाम होतो. या ठिकाणी आपण राहूची वाईट लक्षणं कोणती तसेच, राहूवर मात करण्यासाठी त्याचे उपाय नेमके कोणते आहेत या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

Continues below advertisement


वाईट राहूचे लक्षण 



  • जर राहू ग्रह वाईट असेल तर अनेक घरात, नातेवाईकांत वाद-विवाद होतात. प्रत्येक वेळी घरात नकारात्मकता येते. 

  • घरात राहूचा प्रभाव अशुभ असेल तर घरातील पाळीव पशु-पक्षी काही कारण नसताना अचानक मृत्यू पावतात. 

  • घरातील लोकांमध्ये विनाकारण वाद-विवाद होतात. त्यामुळे तणाव वाढतो. 

  • तसेच, आपल्या आयुष्यात अचानक दुर्घटना घडतात. जसे की, घराला आग लागते, अपघात होतो किंवा चोरी होते. 

  • अनेकदा आपली कामे काही कारणास्तव रखडतात. अनेक प्रयत्न करुनही कामात यश मिळत नाही. 


राहूचे उपाय 


या दरम्यान तुम्ही कोणतेही अनैतिक काम करु नका. घरातील वातावरण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, घरातील बाथरुम-टॉयलेट नेहमीच स्वच्छ ठेवा. घरात सकाळ-संध्याकाळ कापूर लावा. तसेच, राहूच्या मंत्राचा जप करा. जर तुम्ही हे उपाय केले तर राहू दोषापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :          


Budh-Guru Yog 2025 : अवघ्या काही मिनिटांनी 3 राशींचं नशीब पालटणार; गुरु ग्रह बृहस्पती बनवणार शक्तिशाली राजयोग, चौफेर होणार धनलाभ