Budh-Guru Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु ग्रह बृहस्पती प्रत्येक वर्षी राशी परिवर्तन करतात. त्यामुळे एका राशीत पुन्हा येण्यासाठी जवळपास 12 वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, यंदा गुरु ग्रहाची चाल दुप्पट वेगाने वाढणार आहे. त्यामुळे यंदा मिथुन राशीसह कर्क राशीत सुद्धा संक्रमण होणार आहे.
सध्या गुरु ग्रह मिथुन राशीत विराजमान आहे. गुरु ग्रह मिथुन राशीत राहून 24 मे रोजी म्हणजेच आज बुध ग्रहाबरोबर संयोग करुन द्विद्वादश योग निर्माण करणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना या संक्रमणाने चांगलाच लाभ मिळणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध आणि गुरु ग्रह 24 मे रोजी दुपारी 12 वाजून 44 मिनिटांनी एकमेकांच्या 30 डिग्री अंशावर असणार आहे. त्यामुळे हा योग तुमच्यासाठी फार लाभदायक ठरेल.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी गुरु आणि बुध ग्रहाचा हा योग फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांचे आपल्या भावा-बहिणीबरोबर चांगले संबंध असतील. तुमच्या व्यवसायाची चांगली प्रगती झालेली असेल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. या दरम्यान तुमचा धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांना या काळात शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, शिक्षणात तुमचा चांगला विकास झालेला असेल. जे लोक अविवाहीत आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तसेच, तुमच्या व्यवसायात धनलाभाचे योग जुळून येणार आहेत. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. या राशीच्या वैवाहिक जीवनात आनंद राहील. जर तुम्हाला एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असल्यास हा काळ तुमच्यासाठी फार योग्य आणि खास ठरणार आहे. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमच्यातील निर्णय घेण्याची क्षमता दिसून येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :