Astrology Saubhagya Yog 08 October : आज मंगळवार, 8 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नक्षत्रात अनेक शुभ योगांची निर्मिती झाली आहे. आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आहे. आज सौभाग्य योग देखील जुळून आला आहे, जो अनेक राशींसाठी भाग्याचा ठरेल. मुख्यत: 5 राशींना या योगाचा फायदा होईल. या राशींच्या धन-संपत्तीत आज वाढ होईल, मालमत्तेत वाढ होईल. या भाग्यवान राशी कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांची जी काम पैशांमुळे बरेच दिवस रखडली होती ती आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही भविष्य लक्षात घेऊन काही मोठे निर्णय घेताना दिसाल, ते निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. तुमच्या शुभ कर्माचं फळ तुम्हाला भविष्यात नक्कीच मिळेल. आज तुमच्या धन-संपत्तीत वाढ होईल.
कर्क रास (Cancer)
आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. कर्क राशीच्या लोकांना आज बाप्पाचा आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे ते कठोर परिश्रम आणि जिद्दीने आपले उद्दिष्ट पूर्ण करू शकतील आणि तुमची नेतृत्व क्षमता मजबूत होईल. आज तुम्हाला एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळेल. नवीन गाडी-घर घेण्याचा योग आज दिसत आहे, लवकरच त्यात यश मिळेल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा हा दिवस अतिशय शुभ असणार आहे. सिंह राशीचे लोक आज बाप्पाच्या कृपेने त्यांचं धैर्य वाढवतील आणि आज तुम्हाला चांगली बातमी देखील ऐकायला मिळेल. तुमच्यावर काही कर्ज असेल तर ते तुम्ही आज फेडू शकाल आणि पैसे कमवण्याचे नवीन मार्गही तयार होतील. जर तुम्ही खूप दिवसांपासून एखादं काम पूर्ण होण्याची वाट पाहत असाल तर आज ते पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. मालमत्तेत वाढ होईल, घराचं स्वप्न पूर्ण होईल. हताश होऊ नये, लवकरच तुमचे सुखाचे दिवस सुरू होतील.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. मकर राशीचे लोक आज संपूर्ण कुटुंबासह धार्मिक स्थळाला भेट देऊ शकतात आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांकडून भेटवस्तू मिळू शकते. संध्याकाळी तुमच्या जोडीदारासोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करू शकता.
मीन रास (Pisces)
जर आज मीन राशीच्या लोकांना नशिबाने साथ दिली तर तुम्हाला आज जे काही काम करायचं आहे, ते पूर्ण होताना दिसेल आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. जर तुम्ही कोणत्याही मालमत्तेची डील केली असेल तर आज ती तुम्हाला चांगला नफा देऊ शकेल. आज एखाद्या कामात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी दिवस चांगला जाईल. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या व्यक्तीकडून चांगली रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :