Astro Tips : हिंदू धर्मशास्त्रात अनेक परंपरा पाळल्या जातात. त्याचप्रमाणे हिंदू धर्मग्रंथांत प्राण्यांना देखील विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये काही प्राणी दिसणं शुभ मानतात तर काही प्राणी दिसणं अशुभ मानतात. मात्र, मुंगूस (Mongoose) दिसणं शुभ असतं की अशुभ? मुंगूस दिसण्याचा नेमका अर्थ काय? हे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. 


मुंगूस दिसणं म्हणजे साक्षात भगवान श्री विष्णूचं दर्शन


खरंतर हिंदू धर्मात मुंगूस या प्राण्याला फार महत्त्वाचं स्थान आहे. हिंदू धर्मात मुंगूस हा फार शुभ प्राणी मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, मुंगूसाला सूर्याचं प्रतीक म्हणून ओळखतात. मुंगूस व्यक्तीच्या जीवनामध्ये सूर्यासारखा तेजस्वी प्रकाश आणतो. मुंगूस दिसणं म्हणजे साक्षात भगवान श्री विष्णूचं दर्शन करण्यासारखं आहे. तसेच, अनेकदा मुंगूसाचं संबंध आपल्या आर्थिक आणि भौतिक परिस्थितीशी जोडण्यात येतो. 


तसेच, तुमच्या आजूबाजूच्या परिसरात जर मुंगूस दिसत असेल तर पुढच्या सात दिवसांत तुम्हाला पैशांशी संबंधित एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, तुम्ही रस्त्याने जात असताना मुंगूसाने तुमचा रस्ता ओलांडला तर तुमची सर्व कामे सुरळीत होतील असा सूचक इशाराही यामागे आहे. 


कुबेराचं वाहन 


मुंगूस हे कुबेराचे वाहन दिसणं हे धनलाभाच्या दृष्टीने शुभ म्हटले जाते. व्यक्तीला जर मुंगूस दिसला तर आर्थिक भरभराट होणार असा त्याचा संकेत समजला जातो. येणाऱ्या काळात तुमचे नशीब उजळणार याचे लक्षण असते. म्हणजेच धार्मिक शास्त्रानुसार, बघितले तर मुंगूस दिसणं म्हणजेच साक्षात कुबेराचे दर्शन होण्यासारखे असते. 


मुंगूस दिसण्याचे काही शुभ संकेत 


आर्थिक प्रगती 


मुंगूसाचे दर्शन म्हणजे धनलाभ होण्याचे संकेत आहेत असे मानले जाते. 


सकारात्मक बदल 


हा तुमच्या जीवनात नशीब बदलण्याचा आणि चांगल्या बदलांचा सूचक आहे. 


शौर्य आणि धैर्याचे प्रतीक 


मुंगूस सापांना घाबरत नाही, त्यामुळे हे निर्भयता आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते. 


चांगल्या वेळेची चाहूल 


लवकरच तुमच्या आयुष्यात चांगली वेळ येणार असल्याचे हे एक लक्षण आहे. 


हेही वाचा :                                                                                 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


Pitru Paksha 2025 : पितृपक्षात 'ही' 3 झाडं लावाच, पितरांचा मिळेल भरभरुन आशीर्वाद; मनातील इच्छाही होतील पूर्ण