Good and Bad Signs,Troubling Signs In Life : आपल्या पुराणशास्त्रात अनेक शकुन अपशकुन संकेत यांबद्दल सांगितले आहे. असे म्हणतात की, वनावासात जाण्यापूर्वी भगवान राम आणि माता सीता यांनाही काही अशुभ संकेत मिळाले होते. शास्त्रात वेगवेगळे शुभ आणि अशुभ संकेत याबद्दल सांगितले गेले आहे. असे मानले जाते की, जेव्हा काही वाईट घडणार असते, तेव्हा त्या व्यक्तीला आधीच त्याचे संकेत मिळू लागतात. काही लोक त्यांना याबद्दल माहीत असूनही, त्याकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर त्यांना याचा त्रास होतो. त्यामुळे या संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नये, असे घरातील वडीलधरी मंडळी नेहमी सांगतात. काही लोकांना या संकेतांबद्दल फारशी माहिती नसते. त्यामुळे त्यांना याची पूर्वकल्पना येत नाही. चला तर जाणून घेऊया अशाच काही अशुभ संकेतांबद्दल...
मंगळसूत्र अचानक तुटणे
अपशकुनाच्या संकेतानुसार जर एखाद्या महिलेचे मंगळसूत्र अचानक तुटले, तर तिच्या पतीच्या आयुष्यावर संकट येण्याचा हा पूर्वसंकेत असू शकतो. अशा स्थितीत पतीच्या रक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी पत्नीने तुळशीची पूजा करावी.
पूजा करताना ताट पडणे
पूजा करताना पूजेचे ताट पडले तर, ते शुभ लक्षण मानले जात नाही. असे मानले जाते की पूजेचे ताट पडणे हा देखील देव तुमच्यावर कोपल्याचा संकेत असू शकतो. त्यामुळे देवपूजेचे नियम नीट पाळले पाहिजेत. यासोबतच हे नियम आणि शिस्त जीवनातही अंगीकारली पाहिजे.
हातातून कुंकवाचा करंडा पडणे
सिंदूर किंवा कुंकू लावताना स्त्रीच्या हातातून तो करंडा खाली पडला, तर ते शुभ लक्षण मानले जात नाही. असे मानले जाते की, यामुळे पतीच्या व्यवसायात किंवा नोकरीमध्ये अडचणी येऊ शकतात, हे त्याचेच संकेत आहेत. अशावेळी भगवान विष्णूची उपासना केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते.
घरातून बाहेर पडताना शिंका येणे
शास्त्रानुसार एखाद्या कामासाठी निघताना किंवा घराबाहेर पडताना शिंक आल्यास ते शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की, जर तुम्हाला किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला शिंक आली तर ते अशुभ लक्षण मानले जाते. केवळ माणसाचीच शिंक नाही, तर प्राण्याची शिंकसुद्धा खूप अशुभ मानली जाते.
वाटेत पैसे मिळणे
जर, तुम्हाला वाटेत एखादे नाणे पडलेले सापडल्यास याचा अर्थ तुमच्या कामाला वेळ लागू शकतो. वाटेत जर एखादी नोट सापडली तर, तुमचे अडकलेले काम लवकरच पूर्ण होणार असल्याचा संकेत आहे. जर तुम्हाला नाणे आणि नोट दोन्ही मिळाले, तर याचा अर्थ तुमचे काम पूर्ण होईल. परंतु, त्यासाठी तुम्हाला मदतीची गरज लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या