Ashadhi Ekadashi Wishes In Marathi : हिंदूधर्म ग्रंथानुसार, वर्षभरात अनेक एकादशी साजऱ्या केल्या जातात. मात्र, त्यापैकी आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) विशेष महत्त्व आहे. ही सर्वात महत्त्वाची एकादशी मानली जाते. या एकादशीला 'देवशयनी एकादशी' असं देखील म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवसानंतर देव झोपी जातात आणि चातुर्मास सुरु होतो.
महाराष्ट्रात आषाढी एकादशी एकदम थाटामाटात साजरी केली जाते. यंदा आषाढी एकादशी 6 जुलै 2025 रोजी म्हणजेच उद्या साजरी होत आहे, या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना आषाढीचे हे खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता आणि दिवसाचा आनंद घेऊ शकता.
आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश 2025 (Ashadhi Ekadashi Wishes 2025)
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंतपहाताच होती दंग आज सर्व संतआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल,आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
सावळे सुंदर रूप मनोहरराहो निरंतर हृदयी माझे!आषाढी एकादशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
विठू माऊली तू माऊली जगाची,माऊलीत मूर्ती विठ्ठलाची,आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
विठू माऊलीची कृपाआपणा सर्वांवर कायम राहो…जय हरी विठ्ठ्ल!आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
सोहळा जमला आषाढी वारीचासण आला पंढरीचामेळा जमला भक्तगणांचाध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचाआषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
अबीर गुलाल उधळीत रंगनाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंगतुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
तुझा रे आधार मलातूच रे पाठीराखातूच रे माझ्या पांडुरंगाचुका माझ्या देवाघे रे तुझ्या पोटीतुझे नाम ओठी सदा राहोआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
पुंडलिक वरदे हरी विठ्ठलआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
सोहळा जमला आषाढी वारीचासण आला पंढरीचा,मेळा जमला भक्तगणांचा,ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचाआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :