Ashadhi Ekadashi 2024 : 'अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर' संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण विठूमय झालं असून अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) येऊन ठेपली आहे.आषाढी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असं देखील म्हणतात. हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते.
आषाढी एकादशी कधी? (Ashadhi Ekadashi 2024)
यंदा आषाढी एकादशी 17 जुलै 2024 रोजी म्हणजेच आज आहे. मात्र, पंचांगानुसार ही तिथी काल (16 जुलै रोजी) रात्री 8 वाजून 33 मिनिटांनी सुरु झाली आहे. तर, आज रात्री 9 वाजून 33 मिनिटांनी याचं समापन होईल.
हिंदू पंचांगानुसार, आषाढी एकादशीची तिथी ही फार पवित्र मानली जाते. खरंतर, आषाढ महिना सुरु होण्याआधीच वारकऱ्यांना आपल्या विठु-माऊलीचे दर्शन घेण्याचे वेध लागतात. या निमित्ताने ठिकठिकाणांहून पालख्या देखील निघतात. या पालखी सोहळ्यात रिंगण, टाळ-मृदुंग आणि हरिनामाचा गजर करत वारकरी आपली वाट धरतात.
आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त (Ashadhi Ekadashi 2024 Shubh Muhurta)
ब्रह्म मुहूर्त : पहाटे 04:13 ते 04:53 पर्यंत
प्रातः सन्ध्या : पहाटे 04:33 ते 05:34 पर्यंत
विजय मुहूर्त : दुपारी 02:45 ते 03:40 पर्यंत
गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 07:19 ते 07:39 पर्यंत
सायाह्न सन्ध्या : रात्री 07:20 ते 08:22 पर्यंत
अमृत काल : संध्याकाळी 04:23 ते 06:03 पर्यंत
सर्वार्थ सिद्धि योग : सकाळी 05:34 ते दुसर्यादिवशी पहाटे 03:13 पर्यंत
अमृत सिद्धि योग : सकाळी 05:34 ते दुसर्या दिवशी पहाटे 03:13 पर्यंत
चातुर्मास म्हणजे काय? (When Is Chaturmas)
खरंतर, आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणतात. भगवान विष्णूला ही तिथी समर्पित आहे या दिवशी एकादशी तिथीनंतर भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात तेव्हाच चातुर्मासाला सुरुवात होते. याचाच अर्थ, देव पुढचे चार महिने निद्रा घेतात. त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :