Ashadh Amavasya 2025: वैदिक पंचांगानुसार, आषाढ अमावस्या ही एक अतिशय शुभ तिथी मानली जाते. या दिवशी पितृ तर्पण, श्राद्ध कर्म आणि शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, या दिवशी पितर पृथ्वीवर येतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात. तसेच, या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने मोक्ष आणि इच्छा सिद्धी देखील प्राप्त होते. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर यंदाची आषाढ अमावस्येची तिथी अत्यंत शुभ आहे, या वर्षी तब्बल चार शुभ योग बनतायत. 2025 मध्ये ही आषाढ अमावस्या 24 जुलै 2025 (गुरुवार) रोजी येत आहे. या अमावस्येला काही राशी भाग्यशाली ठरणार आहेत. जाणून घ्या..

अमावस्या तिथी

24 जुलै रोजी पहाटे 2:28 पासून सुरू

24 जुलै रोजी रात्री 12:40 (25 जुलै) पर्यंत राहील.

आषाढ अमावस्येला दुर्मिळ योग बनतायत..

2025 वर्षात आषाढ अमावस्येला अनेक शुभ आणि सिद्धी देणारे योग तयार होत आहेत -

गुरु पुष्य योग: 24 जुलै दुपारी 4:43 ते 25 जुलै सकाळी 5:49

हर्षण योग: 23 जुलै दुपारी 12:34 ते 24 जुलै सकाळी 9:51

सर्वार्थ सिद्धी योग: संपूर्ण दिवस

अमृत सिद्धी योग: 24 जुलै दुपारी 4:43 ते 25 जुलै सकाळी 5:49

या शुभ योगांमध्ये, पूजा, तर्पण आणि विशेष उपायांचे फळ अनेक पटींनी वाढते.

यंदा आषाढ अमावस्येला काही राशी भाग्यशाली ठरणार आहेत..

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्याची सुरूवात शुभ ठरू शकते. भोलेनाथांच्या आशीर्वादाने लोकांची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि पैसा मिळेल. व्यवसायात प्रगती होईल आणि कौटुंबिक प्रेम वाढेल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्याची सुरूवात चांगला राहील. त्यांच्या आयुष्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अचानक पैसे मिळाल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. त्यांच्या भौतिक सुखात वाढ होऊ शकते.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्याची सुरूवात खूप फायदेशीर ठरू शकत्. जर या राशीच्या लोकांनी या महिन्यात नवीन काम सुरू केले तर काम पूर्ण होण्याची शक्यता जास्त असेल. परदेशात जाण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफ्याचे दरवाजे उघडतील.

तूळ

तुळ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्याची सुरूवात चांगली ठरू शकते. त्यांच्या करिअरमध्ये चांगले स्थान मिळू शकते. पगारात वाढ होण्याची दारे उघडतील. तुम्हाला जुन्या आजारापासून मुक्तता मिळू शकते. पैशाशी संबंधित बाबींमध्ये परिस्थिती सुधारेल.

कुंभ

हे सर्व शुभ योग कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम आणतील. श्रावण महिन्यात महादेवाची कृपा तुमच्यावर राहील. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील. गुंतवणुकीतून मोठा आर्थिक फायदा होईल. काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :                          

Shani Vakri 2025: शनिदेवांनी त्यांचं काम केलं, आता खरी परीक्षा 'या' 4 राशींची! पुढचे 139 दिवस शनि वक्री, 12 राशींना मोठ्ठं सरप्राईझ मिळणार..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)