Aries Lucky Business: ज्योतिषाच्या 12 राशींपैकी मेष ही पहिली राशी आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. ज्योतिष शास्त्राची पहिली राशी असल्यामुळे या राशीच्या लोकांना आयुष्यात नेहमी पुढे राहणे आवडते. मेष राशीच्या लोक प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊन गर्वाने उभे राहतात. हा त्यांचा सर्वात मोठा गुण आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोक आपले ध्येय साध्य होईपर्यंत प्रयत्न करत राहतात. त्यांना पराभव स्वीकारायला अजिबात आवडत नाही. हे लोक कठीण कार्य करण्याचा दृढनिश्चय करतात आणि ध्येय गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. राशीचा स्वामी मंगळ असल्याने मेष राशीचे लोक ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असतात. कामांचे नियोजन करण्याची त्यांच्यात क्षमता असे. अशातच आज आपण जाणून घेऊया की मेष राशीच्या लोकांसाठी कोणती नोकरी किंवा व्यवसाय सर्वोत्तम ठरू शकतो.
मेष राशीसाठी नोकरी
ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. मंगळ धैर्य आणि उर्जेचा स्रोत मनाला जातो. अशा परिस्थितीत मेष राशीच्या लोकांसाठी इंजिनिअरिंग, सैन्य आणि पोलिस क्षेत्र सर्वोत्तम मानले जाते. याशिवाय मेष राशीच्या लोकांसाठी वकिली, डॉक्टर, ड्रायव्हिंग, ज्वेलर आणि कॉम्प्युटर ही क्षेत्रेही चांगली मानली जातात. मेष राशीचे लोक या क्षेत्रांमध्ये मोठे यश मिळवतात.
मेष राशीसाठी व्यवसाय
नोकरीव्यतिरिक्त मेष राशीचे लोक व्यवसायातही खूप नाव कमावतात. मेष राशीच्या लोकांसाठी वीज, खनिजे, सिमेंट, मेडिकल स्टोअर्स, कोळसा, खनिज तेल, औषध, फटाके, शस्त्रनिर्मिती, खेळ, रंग-व्यवसाय, रिअल इस्टेट, कुस्ती, घड्याळे, रेडिओ, तंबाखू, केमिस्ट इत्यादी व्यवसाय चांगले ठरू शकतात. ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांना यापैकी कोणताही व्यवसाय केल्याने फायदा होईल आणि धन, प्रतिष्ठा वाढेल. तसेच व्यवसाय भागीदाराबद्दल बोलायचे तर, मेष राशीचे लोक कर्क, सिंह, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींसोबत काही प्रमाणात व्यवसाय करू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :
Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ