Aries Monthly Horoscope August 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ऑगस्टचा (August) महिना लवकरच सुरु होतोय. या महिन्यात श्रावणाबरोबरच अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. ग्रहांच्या या संक्रमणाचा मेष राशीवर नेमका कसा परिणाम होणार आहे. तसेच, मेष राशीच्या लोकांचं करिअर, शिक्षण, प्रेम आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल? यासाठी मेष राशीचं मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेऊयात.

मेष राशीची लव्ह लाईफ (Aries August 2025 Love Life Monthly Horoscope)

मेष राशीच्या प्रेमसंबंधाबद्दल बोलायचं झाल्यास, शनीच्या प्रभावामुळे तुमच्या नातेसंबंधात चढ-उतार पाहायला मिळतील. तसेच, तुमच्या लव्ह लाईफमध्ये राहूच्या दृष्टीने तुमच्यातील गैरसमज वाढू शकतात. त्यामुळे वेळीच तुमच्या पार्टनरबरोबर संवाद साधा. नात्यात दुरावा निर्माण होऊ देऊ नका.

मेष राशीचे करिअर (Aries August 2025 Career Monthly Horoscope)

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या काळात बिझनेस संबंधित कामात तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात बुध ग्रहाची वक्री चाल असल्यामुळे बिझनेसमध्ये सतर्क राहण्याची गरज आहे. यासाठीच या काळात कोणत्या प्रकारची गुंतवणूक किंवा कोणताही निर्णय घेताना घाईगडबड करु नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो.

मेष राशीच्या आर्थिक स्थिती (Aries August 2025 Wealth Monthly Horoscope)

मेष राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. मात्र, पैशांचा तुम्हाला जपून वापर करावा लागेल. नोकरदार वर्गातील लोकांवर कामाच्या अनेक जबाबदाऱ्या पडू शकतात. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, इतरांना मदत करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 

मेष राशीचे आरोग्य (Aries August 2025 Health Monthly Horoscope)

आरोग्याच्या बाबतीत तुम्ही जास्त सावधानता बाळगणं गरजेचं आहे. हृदय, त्वचेच्या संदर्भातील रुग्णांनी जास्त काळजी घ्यावी. वेळेवर औषधं, गोळ्या घ्याव्यात. तसेच, 16 ऑगस्टपासून सूर्य-राहूच्या ग्रहण दोषाचा ज्या राशींवर परिणाम होणार आहे अशा लोकांनी जास्त काळजी घ्यावी.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                        

August 2025 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा महिना कसा असणार? कोणावर असणार शंकराची कृपा? मासिक राशीभविष्य