Aries Horoscope Today 9 May 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाईल. नोकरदार (Employees) लोकांना दिलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांशी बोलताना आपल्या बोलण्यात गोडवा ठेवा. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. ज्येष्ठ सदस्यांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या. आज तुमची प्रकृती चांगली राहील. आज काही नवीन आर्थिक करार निश्चित होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. आज कुटुंबीयांबरोबर कीर्तन सोहळ्यात सहभागी व्हा. आज तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल. वैवाहिक जीवन अधिक आनंदी करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबातील सदस्य तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक करतील. लोकांच्या नात्याबद्दल बोलता येईल. आईचा सहवास मिळेल. तुम्ही तुमच्या मनातील समस्या तुमच्या मित्रासोबत शेअर करू शकता.


वैवाहिक नात्यात गोडवा राहील


मेष राशीच्या (Aries Horoscope) नोकरदार लोकांनी आपल्या जुन्या नोकरीला चिकटून राहणे चांगले. आर्थिक स्थितीही हळूहळू सुधारताना दिसेल. आज तुमच्या वैवाहिक नात्यात गोडवा राहील. पती-पत्नीच्या नात्यातील जवळीक वाढताना दिसेल. आज समाजाशी संबंधित कामात मान-सन्मान मिळेल. आज तुम्हाला नोकरीत बढतीच्या संधीही मिळतील. तुमचे मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणं गरजेचं आहे. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी काम करताना दिसाल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह खरेदी आणि पिकनिकला जाण्याची शक्यता आहे


आज मेष राशीचे कौटुंबिक जीवन


कुटुंबात चांगले वातावरण खूप चांगले राहणार आहे. सर्व सदस्य एकमेकांना सहकार्य करताना दिसतील. तुमच्या सासरच्या मंडळींसोबत काही वाद चालू असतील तर आज नात्यात गोडवा येईल. यासोबतच आज वडिलधाऱ्यांचा आशीर्वादही तुमच्यावर राहील. आज कुटुंबीयांबरोबर कीर्तन सोहळ्यात सहभागी व्हा. 


मेष राशीचे आजचे आरोग्य


आरोग्य चांगले राहील, परंतु शारीरिक थकवा जाणवण्याच्या तक्रारी दिसून येतील. विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढा.


मेष राशीसाठी आजचे उपाय 


विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करणे लाभदायक मानले जाईल.


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 9 May 2023 : 'या' राशींसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य