Aries Horoscope Today 3 February 2023 : आज 3 फेब्रुवारी 2023 मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. आज तुम्हाला अचानक लाभ होईल. काही आरोग्याच्या समस्या असू शकतात. तसेच आज कुटुंबात काही समस्या असू शकतात, मेष राशीच्या लोकांना आज नशीब साथ देत आहे. आज प्रत्येक काम सहज पूर्ण होईल आणि आज संपत्ती वाढण्याची शक्यता आहे. आजचे राशीभविष्य जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल?
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खास राहील. सुख-समृद्धी प्राप्त होईल. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्हाला जे काही मिळवायचे आहे, ते तुम्हाला आज मिळेल. अनेक अडकलेली कामे आज पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. आज तुमच्या राशीच्या लोकांसाठी धनलाभाचे शुभ योगही होत आहेत. आज कामाच्या ठिकाणी अधिकारी वर्गाचे सहकार्याचे वातावरण राहील. व्यापारी वर्गाला आज अपेक्षित नसलेल्या ठिकाणाहून अचानक लाभ मिळेल. विशेषत: ऑफिसमध्ये तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. तुमच्या व्यावसायिक प्रकल्पांची गुंतवणूकदारांकडून प्रशंसा होईल.
मेष राशीचे कौटुंबिक जीवन
आज मेष राशीच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं तर घर आणि कुटुंबाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. आज तुमचे काही चांगले मित्र भेटतील. हा दिवस प्रेम आणि रोमान्सचा आहे. लव्ह लाईफच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाईल. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल.
आज मेष राशीचे आरोग्य
आज मेष राशीचे आरोग्य पाहता थकवा आणि डोकेदुखी यासारख्या किरकोळ आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. आज थकव्यामुळे तुमच्या शरीरात आळसही राहील.
आज नशीब 92% तुमच्या बाजूने
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनेक बाबतीत त्यांच्या अनुकूल असेल. त्यांच्या मेहनतीने त्यांना त्यांच्या कार्यात यश मिळेल. मात्र, आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. आज तुम्ही तब्येतीची काळजी घ्याल. लव्ह लाईफ आज खूप चांगली राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. विवाहित लोकांच्या घरगुती जीवनात जवळीक वाढेल आणि तुमचा जोडीदार तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. आज वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने असेल. रोज 'संकटनाशन गणेश स्तोत्र' पाठ करा.
मेष राशीसाठी आजचे उपाय
मेष राशीच्या लोकांनी पाण्यात लाल चंदन टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे आणि मंत्रोच्चार करताना नमस्कार करावा.
शुभ रंग- गुलाबी
शुभ अंक- 6
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या