Aries Horoscope Today 29 May 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या घरात नवीन वस्तू खरेदी करू शकता. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्रांच्या (Friends) मदतीने तुम्हाला नवीन संपर्क देखील मिळतील. नोकरीत (Job) कामगिरी चांगली राहील. वरिष्ठांकडूनही शुभवार्ता ऐकायला मिळेल. कनिष्ठ आणि वरिष्ठांचे पूर्ण सहकार्यही मिळेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील (Family) सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवा. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. जोडीदाराचे आरोग्य (Health) पूर्वीपेक्षा सुधारेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज एखाद्या खास व्यक्तीसोबत भेट होईल, जी तुमच्या जोडीदाराचे रखडलेले पैसे (Money) मिळवण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. नवीन वाहन खरेदीचेही संकेत आहेत.
नोकरीत चांगली संधी मिळेल
आज मेष राशीच्या लोकांचा दिवस शांततेत आणि समाधानाने जाईल. व्यावसायिक जीवनात अनेक बदल होतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. संततीच्या कामातून आराम मिळेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जोडीदाराची साथ मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. संध्याकाळी काही अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रियजनांसोबत दिवस मजेत जाईल.
आध्यात्मिक गोष्टींत मन रमेल
आज तुमचं तुमच्या भावंडांशी खूप पटेल. तुम्ही जुळवून घ्याल. वैवाहिक आयुष्य सुखाचं राहील. घरात कोणताही कलह नसेल. घरचं वातावरण अगदी आनंदात असेल. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, आज तुमचा आध्यात्माकडे कल वळेल. आध्यात्मिक गोष्टींत मन रमेल. मानसिक समाधान मिळेल. पण, शारीरिक थकवा जाणवेल.
आज मेष राशीचे आरोग्य
आज तुम्हाला छातीत दुखण्याशी संबंधित कोणतीही समस्या दिसू शकते. हृदयरोगाचा त्रास असलेल्या लोकांनी औषध आणि आहाराबाबत गाफील राहू नये.
मेष राशीसाठी आजचे उपाय
विष्णु सहस्त्र नामाचा जप लाभदायक ठरेल. सूर्यदेवाला जल अर्पण करा.
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :