Aries Horoscope Today 14 May 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळू शकते. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. नोकरीत तणाव राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. घरात शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील ज्यामध्ये सर्व परिचितांचे येणे-जाणे सुरु होईल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा दिवस असेल. राजकारणात यश मिळेल. उद्या वरिष्ठांकडून काही काम तुमच्यावर सोपवले जाईल, जे तुम्ही पूर्ण करावे अन्यथा ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. 


आर्थिक चणचण भासणार नाही


मेष राशीच्या नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. आर्थिकदृष्ट्या चणचण भासणार नाही. आज तुम्हाला तुमच्या व्यवहारात चांगला मोबदला मिळेल. सामाजिक क्षेत्रात सामूहिक गोष्टींची आवड निर्माण होईल. नातेवाईकांचा पाठिंबा मिळेल. आज तुमच्या कुटुंबातील लोकांमध्ये छोट्या-मोठ्या कारणांवरून गैरसमज होतील. पण, तुम्ही हे गैरसमज दूर करू शकता. शक्य असल्यास कुटुंबाबरोबर संध्याकाळी बाहेर फिरायला जा. तुम्हाला प्रसन्न वाटेल.


आध्यात्मिक गोष्टींत मन रमेल


आज तुमचं तुमच्या भावंडांशी खूप पटेल. तुम्ही जुळवून घ्याल. वैवाहिक आयुष्य सुखाचं राहील. घरात कोणताही कलह नसेल. घरचं वातावरण अगदी आनंदात असेल. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, आज तुमचा आध्यात्माकडे कल वळेल. आध्यात्मिक गोष्टींत मन रमेल. मानसिक समाधान मिळेल. पण, शारीरिक थकवा जाणवेल.


आज मेष राशीचे आरोग्य 


छातीत दुखण्याशी संबंधित कोणतीही समस्या दिसू शकते. हृदयरोगींनी त्यांच्या औषध आणि आहाराबाबत गाफील राहू नये.


आज मेष राशीसाठी उपाय 


आजच्या दिवशी नारायण कवच पठण करणे लाभदायक ठरेल.


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 14 May 2023 : आजचा रविवार 'या' राशीच्या लोकांसाठी आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य