Aries Horoscope Today 10th March 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. आज तुमच्याकडे काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा आणि समज दोन्ही असेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करण्याची संधी आहे. जे युवक वडिलोपार्जित व्यवसाय करत आहेत, त्यांना वडिलोपार्जित व्यवसायात बदल करून पुढे जाता येईल. यामध्ये त्यांना कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. जे समाज कार्यात काम करतात, त्यांचा आज सन्मान वाढेल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांना संमेलनाला संबोधित करण्याची संधी मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची संधी
कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीने वरिष्ठ अधिकारी अधिक प्रभावित होतील. जे समाज कार्यात सक्रिय आहेत, त्यांचा सन्मान वाढेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांना पालकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांना परदेशातही शिक्षणाची संधी मिळेल. ज्या कोणत्या कायदेशीर कामात तुम्ही गेले अनेक दिवस व्यस्त आहात आज तुमचे ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मेष राशीचे आजचे आरोग्य :
आज मेष राशीचे आरोग्य चांगले राहील. पण, शारीरिक थकवा जाणवेल. यासाठी शरीराला काही काळासाठी विश्रांती द्या.
आज मेष राशीसाठी उपाय :
पिवळे वस्त्र परिधान करून विष्णु सहस्त्र नामाचा जप केल्यास लाभ होईल. तुळशीच्या झाडावर तुपाचा दिवा लावावा.
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :