Aquarius July Horoscope 2024, Monthly Horoscope : कुंभ राशीच्या नोकरदारांना पगारवाढ मिळेल आणि पदोन्नती होईल. यावेळी तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत फिरायलाही जाऊ शकता. कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायातही हा महिना यश देईल. यावेळी पालकांच्या आरोग्याची चिंता असू शकते. या महिन्यात तुम्ही काही धाडसी निर्णयही घेऊ शकता. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ फारशी लाभदायक नाही, त्यामुळे भागीदारीत मोठे आर्थिक निर्णय घेणं टाळा. रोमान्ससाठीही हा महिना चांगला म्हणता येईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सावधगिरी बाळगणंही खूप गरजेचं आहे. कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी जुलै महिना नेमका कसा असणार? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया.
कसा असेल पहिला आठवडा? (Aquarius July Month Horoscope)
जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीला कुंभ राशीच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला कोणाचं तरी सहकार्य मिळेल. मानसिक अस्थिरता वाढेल. नवीन वाहनाचा आनंदही संभवतो. प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल, पण तुम्ही त्यांच्याशी सहज जुळवून घ्याल. हा कालावधी जोखीम घेण्यासाठी किंवा अल्पकालीन गुंतवणुकीसाठी योग्य नाही. या काळात तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कसा असेल दुसरा आठवडा? (Aquarius July Month Horoscope)
दुसऱ्या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये अनोख्या संधी मिळतील. मित्र ढालीसारखा उभा राहील. तुम्हाला सहकाऱ्याकडून पाठिंबा आणि तणाव दोन्ही मिळेल. कौटुंबिक जीवन अनुकूल राहील. तरीही मन चंचल राहील. शरीर आणि मनाला विश्रांती मिळेल. सासरची मंडळी काळजीत राहतील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
कसा असेल तिसरा आठवडा? (Aquarius July Month Horoscope)
तिसऱ्या आठवड्यात स्थावर मालमत्तेतून लाभ मिळेल. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. कोणाशी वाद घालू नका, अन्यथा ते महागात पडेल. या आठवड्यात मानसिक ताण वाढेल, पण संयमाने गोष्टी सोडवल्या जातील. आरोग्याचा त्रास होऊ शकतो. नातेवाईक उपयोगी पडतील. हा काळ करिअरमध्ये चांगला योग घेऊन येत आहे.
कसा असेल चौथा आठवडा? (Aquarius July Month Horoscope)
जुलैच्या चौथ्या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल. जवळच्या व्यक्तीच्या दुटप्पी वागण्यामुळे दुःख होईल. शेअर ट्रेडिंगमध्ये सावध राहा. कौटुंबिक वाद टाळा, अन्यथा तुम्ही तणावात येऊ शकता. रागावर आवर घाला. बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. गोड बोलणं लाभदायक ठरेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :