Aquarius Horoscope Today 16 April 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन तंत्रांचा वापर करतील. तुमचे मित्रही तुम्हाला मदत करतील. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत बदलाची संधी मिळू शकते. तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे थकवा जाणवेल. आरोग्याची (Health) काळजी घ्या. थोडी विश्रांती घेतली तर बरं वाटेल. आज तुमच्याकडून खर्चाचा अतिरेक होईल. पैशांचा जपून वापर करा. वाहन चालवताना काळजी घ्या. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात (Family) आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.
आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. वरिष्ठ सदस्य तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. तुमच्या घरी नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जे समाजाच्या सेवेसाठी काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. विद्यार्थी परीक्षेची तयारी मनापासून करतील यामध्ये त्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल.
कुटुंबातील पती-पत्नीच्या नात्यात गोडवा दिसून येईल. भावा-बहिणींच्या उच्च शिक्षणासाठी पैसे गुंतवण्याचा निर्णय घ्याल. आज तुम्ही कुटुंबाच्या भल्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घ्याल, कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा. सक्रिय सहभाग घ्या. ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.
आजचे कुंभ राशीचे आरोग्य
कुंभ राशीच्या लोकांना शुगर आणि ब्लडप्रेशरचा त्रास असलेल्यांनी आजच स्वतःची तपासणी करून घ्यावी. तसेच मिठाई शक्यतो टाळा. औषधाशी संबंधित निष्काळजीपणा अजिबात करू नका. कुंभ राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे.
कुंभ राशीसाठी आजचे उपाय
नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी पिंपळाच्या झाडाखाली लोखंडी भांड्यात पाणी, साखर, दूध, तूप मिसळून पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवा. 21 शुक्रवारपर्यंत हे व्रत करत राहा.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :