Ahmedabad Plane Crash Numerology: अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय 171 हे टेकऑफनंतर काही वेळातच कोसळले. या अपघातात तब्बल 265 जणांचा भयानक मृत्यू झाला, तर यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अपघातात फक्त एकच प्रवासी वाचला. ज्यामुळे स्रवत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या अपघातातून वाचलेल्या व्यक्तीला नशिबाचा चमत्कार म्हणता येईल. एकीकडे जिथे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा या अपघातात मृत्यू झाला, त्यांचा सीट क्रमांक 12 होता, आणि विशेष म्हणजे जो त्यांचा लकी नंबर होता. हा लकी नंबरही त्यांचे प्राण वाचवू शकला नाही अशी चर्चा सुरू असतानाच या अपघातात वाचलेल्या व्यक्तीचा सीट क्रमांक मात्र त्याच्यासाठी भाग्यशाली ठरल्याचं बोललं जातंय. असा कुठला होता त्याचा सीट क्रमांक? अंकशास्त्रात या क्रमांकाचे महत्त्व काय? जाणून घेऊया..
11A सीट क्रमांक लकी कसा ठरला?
अहमदाबाद विमान अपघातात वाचलेल्या व्यक्तीचे नाव विश्वास कुमार रमेश आहे. तो बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत होता आणि 11A क्रमांकाच्या सीटवर बसला होता. एकीकडे या विमान अपघातात मोठी जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. देशभरातील आणि जगभरातील लोकांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे, तर 11A क्रमांकाच्या प्रवासी आणि सीट क्रमांकाच्या बचावाबद्दलही लोक चर्चा करत आहेत. 11 क्रमांक त्याच्यासाठी भाग्यवान ठरला आहे. अंकशास्त्रात 11 क्रमांकांचे महत्त्व काय? हा क्रमांक शुभ आहे की अशुभ? जाणून घेऊया...
11 क्रमांक शुभ की अशुभ? अंकशास्त्रात म्हटलंय..
तुम्हाला कदाचित वाचून आश्चर्य वाटेल, पण अंकशास्त्रात 11 क्रमांकाला 'मास्टर नंबर' म्हणतात. म्हणजेच हा एक अत्यंत शुभ क्रमांक आहे. 11 क्रमांकात 1 आणि 1 जोडलेला आहे, ज्यामुळे डबल अंकाची दुप्पट उर्जा यात भरलेली आहे. 11 क्रमांक हा ऊर्जा, आध्यात्मिक शक्ती, ज्ञान, प्रेरणा, अंतर्ज्ञान यांचे प्रतीक मानला जातो. मास्टर नंबर म्हणजे अशी संख्या ज्यामध्ये समान संख्या दोनदा दिसून आली आहे. जसे की 11, 22, 33 इत्यादी. मास्टर नंबरमध्ये त्यांच्या संख्येच्या दुप्पट ऊर्जा असते. 11 क्रमांकामध्ये अलौकिक शक्ती असतात. अंकशास्त्रानुसार, 11 क्रमांक सामान्य नाही. त्यात अलौकिक शक्ती लपलेल्या आहेत. त्यात उच्च पातळीच्या चेतनेचा दर्जा आहे. जर या संख्येचे लोक त्यांच्या उर्जेचा योग्य वापर करतात तर त्यांना यश मिळते. ते स्वतःला जागृत करण्यात यशस्वी होतात. त्या आधारावर ते स्वतःसाठी प्रगतीचा मार्ग तयार करतात. या लोकांमध्ये नेतृत्व क्षमता असते.
11 अंकात अद्भूत शक्ती असते?
अंकशास्त्रानुसार, मूलांक 11 हा अंक असलेले लोक सर्जनशील असतात आणि त्यांच्यात कल्पनाशक्तीची अद्भुत शक्ती असते. याचे कारण चंद्र आहे. जर तुम्ही 1 आणि 1 जोडला तर तो अंक 2 बनतो, ज्याचा स्वामी चंद्र आहे. जर तुम्ही या गुणांचा योग्य वापर केला तर तुम्ही एक वेगळी ओळख निर्माण करू शकता.
11 हा अंकामध्ये कोणतीही घटना किंवा परिस्थिती पाहण्याची क्षमता?
अंकशास्त्रानुसार, 11 या अंकाशी संबंधित लोक जीवनाचा खरा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. असे लोक अध्यात्माकडे झुकलेले असतात. या लोकांमध्ये कोणतीही घटना किंवा परिस्थिती त्याच्या मर्यादेपलीकडे पाहण्याची क्षमता असते. असे लोक इतरांचे सुख-दु:ख समजून घेतात, दुःखाच्या वेळी इतरांबद्दल सहानुभूती बाळगतात.
11 या अंकाच्या लोकांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
- प्रत्येक संख्येशी चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी जोडलेल्या असतात. 11 या अंकाच्या लोकांना इतरांचा हेवा वाटू शकतो. हे टाळावे.
- कधीकधी 11 क्रमांकाचे लोक स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ लागतात. कधीकधी ते गोंधळाचे बळी देखील पडतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या गुरु, कुटुंबातील सदस्य, तुमच्या प्रियजनांची मदत घेऊ शकता.
- जर 11 क्रमांकाचे लोक त्यांच्या उर्जेचा नकारात्मक वापर करत असतील तर ते त्यांच्यासाठी समस्या निर्माण करू शकते. तुम्हाला जीवनात तणाव आणि गोंधळाचा सामना करावा लागू शकतो.
- अनेक वेळा तुमच्यामध्ये अहंकाराची भावना निर्माण होऊ शकते. म्हणून, तुम्ही तुमची आध्यात्मिक बाजू मजबूत करावी. ज्ञानाने अहंकार दूर करण्याचा प्रयत्न करा.
- कधीकधी हे लोक अतिआत्मविश्वासाचे बळी ठरू शकतात, ज्यामुळे त्यांचे नुकसान होते. त्यांचे काम चुकीचे होऊ शकते.
हेही वाचा :
Air India Plane Crash In Ahmedabad: मोठा विमान अपघात होणार! 'तिने' आधीच भाकीत वर्तवलं होतं, महिला ज्योतिषाची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली, पोस्ट व्हायरल..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)