Solar Eclipse : पहिले सूर्यग्रहण 1 मे 2022 रोजी झाले. ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या घटनांना खूप महत्त्व दिले जाते. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्म्याचा कारक आणि चंद्राला मनाचा कारक मानला जातो. हे दोन्ही ग्रह मानवावर खूप प्रभाव टाकतात. 2022 मध्ये जेव्हा सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची परिस्थिती निर्माण होत आहे. 


सूर्यग्रहण 2022
ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा अधिपती म्हटले आहे. यासोबतच सूर्य हा पिता आणि आत्मा यांचा कारक मानला गेला आहे. असे मानले जाते की जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्यभागी जातो, म्हणजेच जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा सूर्यग्रहण होते.


या वर्षी किती ग्रहण होतील?
2022 मध्ये एकूण चार ग्रहणे आहेत. त्यापैकी दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहणांचा योगायोग आहे.


पंचांगनुसार, पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी झाले आहे. हे वर्षातील पहिले ग्रहण होते. 


पंचांगनुसार, पहिले चंद्रग्रहण 16 मे 2022 रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण दक्षिण-पश्चिम युरोप, दक्षिण-पश्चिम आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, अंटार्क्टिका आणि अटलांटिक महासागर या भागातून दिसणार आहे. 2022 वर्षातील दुसरे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. हे ग्रहण ईशान्य युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा बहुतांश भाग, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक, अंटार्क्टिका आणि हिंदी महासागर या भागातून पाहता येईल.


2022 चे दुसरे सूर्यग्रहण
पंचांगनुसार, 2022 मधील दुसरे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. हे देखील आंशिक सूर्यग्रहण असेल. दुसरे सूर्यग्रहण युरोप, दक्षिण-पश्चिम आशिया, उत्तर-पूर्व आफ्रिका आणि अटलांटिक महासागरातून दिसणार आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या : 


'या' राशीच्या लोकांना त्रास देण्यासाठी येणार शनि, चुकूनही करून नका 'हे' काम 


Mars Transit 2022 : 'या' राशींच्या लोकांच्या वाढणार अडचणी


Horoscope Today, May 3, 2022 : 'या' पाच राशींना फलदायी ठरणार अक्षय्य तृतीयेचा शुभ योग, जाणून घ्या कसा राहील दिवस