Vidur Niti : भगवान श्रीकृष्णाचे प्रिय महात्मा विदुरजी महाराज धृतराष्ट्र यांचे सल्लागार होते. महात्मा विदुर यांनी मानवाच्या अवगुणांबद्दल बोलताना धृतराष्ट्राला सांगताक की विशिष्ट प्रकारच्या व्यक्तींचे आयुष्य फारच कमी असते. अगदी लहान वयातच त्यांचा मृत्यू होतो. महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वीच महात्मा विदुरांनी धृतराष्ट्राला सांगितले होते की हे युद्ध अत्यंत प्रलयकारी असेल आणि त्याचा परिणाम राजवंशासाठी शुभ नसेल. महात्मा विदुरजींनी सांगितलेल्या त्या गोष्टी आजही आपल्याला मार्गदर्शन करतात.
लोभी आणि स्वार्थी व्यक्ती
विदुर नीतीनुसार लोभ आणि स्वार्थ हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. जो मनुष्य लोभी असतो त्याचे जीवन लवकर संपते. लोभ माणसाला आंधळा बनवतो. इतरांची संपत्ती आणि वैभव पाहून तो प्रत्येक क्षणी जळत राहतो. त्यामुळे त्याचे आयुष्य कमी होते.
संतप्त व्यक्ती
क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा राग येतो तेव्हा माणूस योग्य आणि अयोग्य ठरवू शकत नाही. विदुरजी म्हणतात की, रागापासून दूर राहावे. रागाच्या भरात एखादी व्यक्ती स्वतःचे नुकसान करते. त्यामुळे त्याचे आयुष्य कमी होते.
अहंकारी व्यक्ती
अहंकारी व्यक्ती योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवू शकत नाही. अहंकाराने त्याची बुद्धी नष्ट होते. ज्याला आपल्या संपत्तीचा, सामर्थ्याचा अभिमान आहे, तो लोकांचा तिरस्कार करतो. त्यांचा अपमान करतो. त्यामुळे तो एकाकी पडतो. विदुर नीतीनुसार व्यक्तीने आपला अहंकार टाळावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या