जालना : महाराष्ट्र राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईनची विक्री करण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यानंतर विविध स्तरातून शासनाच्या या निर्णयावर टीका होण्य़ास सुरुवात झाली. ज्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'वाईन आरोग्यासाठी हानीकारकच असून, आम्ही कोणालाही वाईन घ्या म्हणून निमंत्रण देत नाही' असं म्हटलं आहे. तसंच शेतीच्या अर्थकारणाच्या दृष्टीने मात्र हा निर्णय चांगला असल्याचंही ते म्हणाले. 


राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी आता सुपरमार्केट अर्थात किराणा सामान मिळणाऱ्या ठिकाणी वाईनची विक्री केली जाणार असल्याचं सांगितलं. दरम्य़ान किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय योग्य नसल्याचे अनेकांनी म्हटलं. अशाप्रकारे वाईन विक्री केल्यास त्याचे विपरीत परिणाम होतील असे काही जणांचे म्हणणे आहे. दरम्य़ान आता यावर राजेश टोपे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शेतीच्या अर्थकारणाच्या दृष्टीने बोलताना ते म्हणाले, ''वाईन आरोग्यासाठी हानीकारकच आहे. पण शेतीच्या अर्थकारणाच्या दृष्टीने वाईन विक्रीचा निर्णय घेतला असून सरकार वाईन विक्रीला प्रोत्साहन देत नाही त्यामुळे या निर्णयाकडे शेती आणि शेतीच्या अँगलने बघावे.''


'अर्थसंकल्पात आरोग्य विभागाला झुकतं माप द्यावं'


राज्यांना आरोग्यविभागासंबधी बांधकामासाठी निधी उपलब्ध करावा. तसंच केंद्र पुरस्कृत मेडिकलकॉलेज साठीही तरतूद व्हावी. असं म्हणच अर्थसंकल्पात आरोग्य विभागाला झुकतं माप द्यावं, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ग्रामीण भागांतील नागरिकांच्या आरोग्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करावा असंही टोपे म्हणाले.


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha