Seed Subsidy Scheme : सध्या खरीपाचा हंगाम संपला असून, परतीच्या पावसानं (Rain) देखील देशातून निरोप घेतला आहे. या हंगामात परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं या पावसामुळं वाया गेली आहेत. सध्या रब्बीचा हंगाम (Rabi Season) सुरु झाला आहे. आता शेतकऱ्यांची मदार ही रब्बीच्या हंगामावर आहे. देशातील बहुतांश भागात रब्बी पिकांची पेरणी सुरू झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार बियाणे (Seeds) खरेदी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अशात राजस्थान (Rajasthan) सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राजस्थान सरकारच्या कृषी विभागाने गहू, बार्ली आणि हरभरा पिकांचे बियाणे शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर उपलब्ध करुन देण्याची योजना आखली आहे.
कृषी विभागाचं 1 हजार 900 क्विंटल बियाणे विक्रीचं उद्दिष्ट
राजस्थान सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. रब्बी हंगामासाठी लागणाऱया बियाणांवर 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. अहवालानुसार, बियाणे उत्पादन संस्था, नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड, राजस्थान स्टेट सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड, क्रिभको, नाफेड, एचआयएल आणि नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याकडून तयार करण्यात आलेलं बियाणं शेतकऱ्यांना दिलं जात आहे. रब्बी पिकांच्या ज्या जातींचे बियाणे 10 हजार रुपये प्रति क्विंटल दराने बाजारात उपलब्ध असेल, त्यांना राज्य सरकार 50 टक्के अनुदान म्हणजेच कमाल 5 हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान देईल. सध्या कृषी विभागानं 1 हजार 900 क्विंटल बियाणे विक्रीचे उद्दिष्ट ठेवलं आहे.
बार्लीचे 400 क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट
काही सुधारित वाणांचे बार्ली बियाणे बाजारात तीन हजार 800 रुपये प्रतिक्विंटल दराने विकले जात आहे. या सुधारित वाणांच्या बियाण्यांवर 50 टक्के म्हणजेच कमाल तीन रुपये प्रति क्विंटल अनुदान दिले जात आहे. या अनुदानाचा लाभ देऊन कृषी विभाग 1 हजार 900 रुपये प्रतिक्विंटल दराने बियाणे उपलब्ध करुन देणार आहे. राज्यात भरड धान्य योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एकूण 400 क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
गव्हाच्या बियाणे 1 हजार 700 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात येणार
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत गव्हाच्या बियाण्यांवर 50 टक्के अनुदानाची म्हणजेच कमाल 2,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गव्हाच्या काही सुधारित जातींचे बियाणं बाजारात 3 हजार 400 रुपयांना विकलं जात आहे. आता राज्य सरकार हे बियाणं शेतकऱ्यांना 1 हजार 700 रुपये क्विंटल दराने देणार आहे. यासाठी 5.780 क्विंटल बियाणे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: