Wardha Rains : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील देवळी तालुक्यात झालेल्या जोरदार परतीच्या पावसाने (Rain) शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा नुकसान केलं असून त्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. मागील तीन दिवस देवळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये जोरदार परतीचा पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून असल्याने काढणीला आलेले पीक खराब होऊ लागले आहेत. 2022 हे वर्ष शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलं असून अशी अतिवृष्टी पुन्हा होऊ नये अशीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

कापणीसह मळणीच्या कामाला ब्रेकवर्धा जिल्ह्यात जवळजवळ आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे आणि देवळी तालुक्यात थांबून थांबून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवस झालेल्या परतीच्या पावसाने पुन्हा सोयाबीन कापणी तसेच मळणीच्या कामाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे नुकताच अतिवृष्टीतून सावरत असलेला शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यावर संकटदेवळी तालुक्यातील टाकळी धरणेसह अनेक गावांमध्ये शेतात सोयाबीन आणि कपाशीचे पीक उभे आहे. पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीतून हे पीक कसंबसं वाचलं होतं. आता शेतकऱ्यांना शेतात जाणं देखील कठीण झालं एवढंच नाही तर जमीन प्रचंड ओली असल्याने काढणी अशक्य झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर पीक घरात येत असल्याने त्याला दिवाळीचा बोनस समजलं जायचा. मात्र यावर्षी दिवाळी देखील संकटात असल्याचे चित्र दिसत आहे..

अतिवृष्टीतून बचावलेल्या पिकांची परतीच्या पावसाने केली नासाडीधो धो बरसल्या पावसाने अतिवृष्टीतून बचावलेल्या सोयाबीन आणि कपाशीच्या पिकाची परतीच्या पावसाने पूर्णपणे नासाडी केल्याचे चित्र देवळी तालुक्यातील काही गावातील शेतात बघायला मिळत आहे. पिकांची अतिशय दयनीय अवस्था असून एदलापूर, पिंपरी, खैरखेड, चोरवड, मालठाणा, परिसरातील शेतातील नुकसान झाले. अडगावातून जाणाऱ्या विद्रुपा नदीला पुराचे पाणी कल्व्हर्टवरुन वाहून गेल्याने पूर आल्याने शेतीचे नुकसान झालं. त्यामुळे त्वरित पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आहे.

अकोल्यातील बोर्डीमध्ये ढगफुटीसदृष्य पाऊस, पिकांचं नुकसानअकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी परिसरात मंगळवारी (11 ऑक्टोबर) सकाळी ढगफुटीसदृष्य पावसाने होत्याचं नव्हतं केलं. या ढगफुटीनं अनेक गावांतील शेतातली पिकं अक्षरश: मातीमोल झाली. बोर्डी परिसरातील कासोद-शिवपूर, शहापूर, रहाणापूर, उमरा, मक्रमपूर, बोर्डी, पिंप्री, पिंप्री जौनपूर अडगाव, या गावांत शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पावसानं परिसरातील कपाशी, तूर, संत्रा, हळद आणि सोयाबीनची पिकं पार मातीमोल झाली आहेत. या पावसाने अकोट, तेल्हारा तालुक्यातील 17 गावांत जवळपास 9 हजार हेक्टरवर नुकसानं झालं आहे.

संबंधित बातमी

Wardha Rains : मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर, वेणी इथे पुराच्या पाण्यातून मृतदेह गावाला नेण्यासाठी जीवघेणी कसरत