Weather Update:राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून बीड, गेवराई, लालना, हिंगोलीसह बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. काही भागात गारपीट, वादळी वाऱ्यांची हजेरीही लागली.  दरम्यान, मराठवाड्यात पुढील पाच दिवस काही भागात अवकाळी पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. (Marathwada Weather)

मराठवाडयात दिनांक 09 ते 15 मे 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाचा अंदाज काय?

प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, दिनांक 06 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, परभणी, हिंगोली, नांदेड व जालना जिल्हयात तर दिनांक 07 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून गारपीटीसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दिनांक 06 मे रोजी बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 07 व 08 मे रोजी नांदेड, लातूरधाराशिव जिल्हयात जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 9 व 10 मे रोजी मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

मराठवाडयात दिनांक 09 ते 15 मे 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी काय करावे?

काढणी केलेल्या हळद पिकाची उकडणे, वाळवणे व पॉलीश करणे ही कामे करून मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी. उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तुडतुडे, फुलकीडे व पांढरी माशी) कीडींना आकर्षीत करण्यासाठी एकरी 10 ते 12 पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचे व लाल केसाळ अळीचे समूहातील अंडी लहान अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंचा ॲझाडिरेक्टिन (30 पीपीएम) 3 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

घड लागलेल्या  केळी झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. केळी बागेस आवश्यकतेनूसार सरी वरंब्याने पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.

नविन लागवड केलेल्या केळीच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी करून घ्यावी. जोराच्या वादळी वाऱ्यामुळे फळगळ व फांद्या तुटल्या असल्यास पडलेली फळे व तुटलेल्या फ़ांद्या गोळा करून विल्लेवाट लावावी. आंबा बागेत पाण्याचा ताण बसल्यामूळे फळगळ होऊ शकते, फळगळ होऊ नये म्हणून आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.

नविन लागवड केलेल्या आंब्याच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. काढणी राहिलेल्या द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी. द्राक्ष बागेतील माती मोक्ळी करून खत व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेमध्‍ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी 15 एप्रिल ते 15 मे या दरम्यान करावी. बागेची छाटणी पाऊसाचा अंदाज पाहूनच पाऊस नसताना करावी.

हेही वाचा:

Maharashtra Weather Update: बीड, हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस; 23 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता, 'वाचा हवामान विभागाचा अंदाज