Maharashtra Soyabean Price : सध्या सोयाबीन (Soyabean) उत्पादक शेतकरी (Farmers) चिंतेत आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोयाबीनच्या दरात जवळपास दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सोयाबीनला बाजारात तीन ते चार हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. या दरातून उत्पादन खर्च देखील निघत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.


दरम्यान, 2022 हे वर्ष शेतकऱ्यांसाठी फारसे चांगले राहिले नाही. अतिवृष्टी, पूर, परतीचा पाऊस यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय पिकावर कीड आणि रोगांचा देखील मोठा प्रादुर्भाव झाला आहे. अशातच महाराष्ट्रात हवामान बदलामुळं पपई, संत्रा आणि मिरची या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता सोयाबीनच्या दराबाबतही असेच संकट समोर आले आहे. सोयाबीनला दर नसल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.


सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठा 


सोयाबीन सध्या तीन ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकले जात असल्याचे महाराष्ट्रातील स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठा आहे. खते, बियाणे, कीटकनाशके, सिंचन यावर शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत. मात्र, उत्पादन खर्च वाढला असतान सोयाबीनला योग्य दर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.


 केंद्र सरकारने सोयाबीनची एमएसपी वाढवावी 


राज्यात 9 ते 11 हजार रुपये प्रतिक्विंटलने सोयाबीनची विक्री झाली होती. तेव्हा विक्रीतून शेतकऱ्यांना नफा मिळत होता. मात्र आता सोयाबीनचे दर गडगडले आहेत. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.  केंद्र सरकारनं सोयाबीनचा MSP केवळ 4 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल ठरवला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या दरानं सोयाबीन विकल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत आहे. त्यामुळं केंद्र सरकारने एमएसपी वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 


एकीकडे कापसाची घसरण तर दुसरीकडे सोयाबीनची


आधीच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. सोयाबीन कापूस पिकाला मोठा फटका बसला होता. या फटक्यातून काही शेतकऱ्यांची पीक वाचली आहेत. या पिकांना योग्य दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, एककडे कापसाच्या दरात घसरण सुरु असतानाचं दुसरीकडे सोयाबीनच्या दरात देखील मोठी घसरण होत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : सोयाबीन-कापूसप्रश्नी फडणवीसांचे वाणिज्य मंत्री पियूष गोयलांना पत्र, वाचा काय आहेत मागण्या?