Raju Shetti : एकीकडे राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच दुसरीकडे अनेक ठिकाणी वीज कपात केली जात आहे. याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. अशातच ऊर्जा विभागाकडून थकित वीजबिलांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील मंत्र्यांची आणि आमदार, खासदारांची नावे आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर वीज बिले थकित असल्याचे समोर आले आहे. या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे. शेट्टी यांनी थकीत वीज कनेक्शनसाठी आत्महत्या केलेल्या पंढरपूरमधील एका शेतकऱ्याचा दाखला दिला आहे. 'सुरज तु कदाचित आमदार, खासदार किंवा मंत्री असतास तर तुला थकीत वीज कनेक्शनसाठी आत्महत्या करण्याची वेळ आली नसती', असे शेट्टींनी म्हटले आहे.
काय होती घटना
वीज तोडणीला कंटाळून पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येतील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सूरज जाधव असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव होते. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करुन शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरणवर वैतागून ही आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी शेतकऱ्याने आपला व्हिडिओ बनवला, आणि सोशल मिडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये त्याने परत शेतकरी जन्माला येणार नाही असे सांगितले आहे. यानंतर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. शेतमालाला भाव नाही म्हणून कर्जे घेऊन दूध व्यवसाय सुरु केला, पण दुधालाही दर मिळत नसल्याने निराश होत आता पुन्हा शेतकरी जन्म नको म्हणत तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता.
कोणाकडे किती थकबाकी?
आरोग्यमंत्री राजेश टोपे याची चार लाख रुपये थकबाकी
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात 10 हजार रुपये थकबाकी
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 2 लाख 63 हजार रुपये थकबाकी
राज्यमंत्री विश्वजित कदम यांची 20 हजार रुपयांची वीज बिल थकीत आहे
श्रीमंत युवराज संभाजीराजे 1 लाख 25 हजार 934
माजी मंत्री सुभाष देशमुख यांची तीन वीज कनेक्शन आहेत मिळून 60 हजार रुपये थकबाकी आहे
भाजप आमदार जयकुमार गोरे सात लाख रुपये थकबाकी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 2 लाख 25 हजार थकीत
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे 70 हजार रूपये थकबाकी
आमदार समाधान आवताडे एकूण वीस हजार थकबाकी
आमदार राजेंद्र राऊत बार्शी 3 लाख 53 हजार रूपये थकबाकी
आमदार बबनराव शिंदे व त्यांचे आमदार बंधू संजय शिंदे आणि कुटुंबियांची तब्बल 22 विज जोडणीतील तब्बल 7 लाख 86 हजार रुपयांची थकीत
खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची चार विज जोडणीतील तीन लाख रुपये
आमदार संग्राम थोपटे यांची चार विज जोडणीतील 1 लाख रुपये थकीत
माजी खासदार प्रतापराव जाधव दिड लाख रुपये थकीत
शिवसेना आमदार सुहास कांदे 50 हजार रुपये थकीत
आमदार रवी राणा 40 हजार रुपये थकीत
आमदार वैभव नाईक यांच्या औद्योगीक विज जोडणीची 2 लाख 80 हजार थकबाकी
माजी मंत्री विजयकुमार गावित 42 हजार थकबाकी
माजी आमदार शिरीष चौधरी 70 हजार थकबाकी
मंत्री संदीपान भुमरे 1 लाख 50 हजार रुपयांची थकबाकी
खासदार रजनीताई पाटील यांची 3 लाख रुपये थकबाकी
आमदार प्रकाश सोळंके 80 हजार रुपये थकबाकी
आमदार संदीप क्षीरसागर 2 लाख 30 हजार रुपयांची थकबाकी
राज्यमंत्री संजय बनसोडे 50 हजार रुपयांची थकबाकी
आमदार अशिष जयस्वाल 3 लाख 36 हजार रुपये थकीत
आमदार महेश शिंदे 70 हजार रुपये
माजी मंत्री सुरेश खाडे यांचे कुटुंबीय याची 1 लाख 32 हजार थकबाकी
सुमन सदाशिव खोत 1 लाख 32 हजार 435
महत्त्वाच्या बातम्या:
- Pandharpur News : वीज तोडणीचा पंढरपूरात पहिला बळी, Video शेअर करत शेतकऱ्याने संपविले जीवन
- ऊर्जा विभागाकडून थकित वीजबिलांची नवी यादी जाहीर, नव्या यादीत अजित पवारांचं नाव नाही