Raju Shetti: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या संकल्पनेतून कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठामध्ये पहिले नांगरट साहित्य संमेलन (Nangarat Sahitya Sammelan) घेण्यात आले. बैल आणि नांगराचे पूजन करून या साहित्य संमेलनाचा प्रारंभ करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आणि रामदास फुटाणे यांच्या उपस्थितीत हे साहित्य संमेलन सुरु झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर साहित्यिक, कलावंत, विचारवंत यांच्यामध्ये सखोल विचारमंथन व्हावं, शेतकरी चळवळीला यातून दिशा मिळावी हा या साहित्य संमेलना पाठीमागचा हेतू आहे. या संमेलनात राजू शेट्टी यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आश्रम उभारणार असल्याची घोषणा केली आहे. 


जयसिंगपूर येथे आश्रम सुरू करणार


आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आश्रम सुरू करण्यात येणार आहे. हा आश्रम जयसिंगपूरमध्ये सुरु करण्यात येणार आहे. किमान पदवीपर्यंत शिक्षण देता यावे यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले. पुढील नांगरट साहित्य संमेलनापर्यंत आश्रम सुरू करणार असल्याची ग्वाही शेट्टी यांनी दिली. 


राजू शेट्टी काय म्हणाले?


आश्रम सुरु करण्यामागची पार्श्वभूमी सांगताना राजू शेट्टी म्हणाले की, सततची नापिकी, वर्षानूवर्ष तोट्याची शेती असल्याने काढलेलं कर्ज फेडत येत नाही आणि बुडवण्याची हिंमत नाही त्यामुळे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. अशा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी निवासी वसतीगृह काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. देशाच्या संसदेन शिक्षणाचा कायदा करून दिला, पण परवडते का याचा विचार केला नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या