Dadaji Bhuse : महिलांचा सन्मान ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. महिला शेतकऱ्यांनी जर अर्ज केला तर त्यांना प्राधान्य दिले जाते. प्रत्यक्ष कृतीमधून त्यांना मान सन्मान दिला जातो. वेगवेगळ्या योजनांमध्ये महिलांना आम्ही सन्मान देत असल्याचे मत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले. त्यामुळे कुटुंबातील महिलांचे नाव लवकरात लवकर साताबारा उताऱ्यावर लावून घ्यावे असे आवाहन यावेळी भुसे यांनी केलं. लक्ष्मी योजनोच्या माध्यमातून जरी आपण तहसीलदाराकडे अर्ज केला तरी पहिली नावं तशीच राहतील यासह 15 दिवसाच्या आत त्या महिलेचं नाव सातबाऱ्यावर लागेल असे भुसे यावेळी म्हणाले. 


15 दिवसाच्या आत सातबाऱ्यावर नाव लागेल


ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांना लगेच 15 दिवसांच्या आत सातबाऱ्यावर नाव लागेल असे दादाजी भुसे यावेळी म्हणाले. मोठ्या प्रमाणावर योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर घरातील महिलांचे नाव सातबारा उताऱ्यावर लावावी असे आवाहन यावेळी भुसे यांनी केलं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक घोषणा केल्या गेल्या, सोबतच विकासकामांचे दावे देखील केले गेले. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना सारख्या महाभयंकर लाटेचा सामना करावा लागला. सरकारसमोर अनेक अडचणी आल्या. केंद्राकडून राज्यावर अन्याय होत असल्याच्या भावना राज्य सरकारमधील बड्या नेत्यांनी वारंवार व्यक्त केल्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षानं एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. यासह विविध प्रश्नांवर आज दिवसभर एबीपी माझावर महाचर्चा होणार आहे. या चर्चेत कृषीमंत्री दादाजी भुसे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विविध प्रश्नावर त्यांची भूमिका मांडली.


पीक विमा योजनेच्या अटी, शर्थी केंद्राकडून ठरवल्या जातात. राज्याच्या हातात फक्त त्या योजनांची अंमलबजावणी करणे एवढंच आहे. 2020 मध्ये शेतकऱ्यांना खूप कमी परतावा मिळाला ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान कंपन्यांना कळू शकले नाही असेही भुसे म्हणाले. त्यामुळे पीक विम्याच्या बाबतीत बीड मॉडेल लागू करावे. यामुळे कंपन्यांच्या नफ्याला मर्यादा लागेल असे भुसे यावेळी म्हणाले. बीड मॉडेल लागू करावे अशी आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केल्याचे भुसे यावेळी म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या: