Narendra Singh Tomar : कृषी क्षेत्रात (Agriculture Sector) खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर आधारित प्रकल्प व्यवस्थापन एककाचा आरंभ केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांच्या हस्ते करण्यात आला. कृषी क्षेत्रात बळकटी आणण्याची गरज आहे. त्यामुळं इतर क्षेत्रंही मजबूत होतील असे वक्तव्य यावेळी कृषीमंत्री नरेद्र सिंह तोमर यांनी यावेळी केलं. खासगी- सार्वजनिक भागीदारी हे शेतीच्या विकासासाठी आदर्श मॉडेल आहे. खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्वांवरील प्रकल्पांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या माध्यमातून त्यांना लाभ पोहोचवण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं असंही तोमर यांनी यावेळी सांगितलं. 


कृषीक्षेत्राचे सक्षमीकरण आवश्यक


देशासाठी तसेच समाजासाठी कृषीक्षेत्राचे सक्षमीकरण आवश्यक असल्याचे मत नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात 1 हजार 500 हून अधिक कालबाह्य कायदे मोडीत काढून व्यवस्थेचे सुलभीकरण केले आहे. त्यामाध्यमातून  सामान्य माणसाचे जीवन सुलभ केलं असल्याचे मत नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केलं आहे.




सरकारच्या पुढाकारानं शेतकऱ्यांना प्रोत्साहन 


व्यापार आणि उद्योग क्षेत्र मजबूत आणि संघटीत आहे. त्यांना सर्व साधने उपलब्ध आहेत. ती कृषी क्षेत्राच्या विकासाला प्रोत्साहन देऊ शकतील. कृषीसंबधित पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा निधी, 10,000 शेतकरी उत्पादक संघटनांची (FPO) स्थापना आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना यासारख्या योजनांच्या माध्यमातून सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने पावले उचलत असल्याचे नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. शेतकरी संघटनांच्या स्थापनेसाठी, त्यांना मजबूती देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा परिचय करुन घेता यावा, शेतीतून लाभदायक उत्पन्न आणि जागतिक दर्जाचे उत्पादन घेता यावे यासाठी सरकारचे प्रयत्न जारी असल्याचे तोमर यांनी सांगितले. सरकारच्या पुढाकारानं शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत असून  त्याचे सुपरिणाम आपल्याला दिसत असल्याचं तोमर यांनी सांगितलं. कृषी क्षेत्राच्या कल्याणासाठी केंद्र सरकारनं अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजना हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यामुळं कोणताही पात्र शेतकरी सन्मान निधीपासून वंचित राहू नये असेही तोमर यावेळी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: