PM Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने अनिवार्य ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा 31 ऑगस्ट 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत 31 जुलै 2022 होती. पीएम किसान पोर्टलवर नोटीसद्वारे ही माहिती शेअर करण्यात आली आहे. पीएम-किसान योजनेंतर्गत, सरकार प्रत्येक भूमिधर शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत करते.


आता नवीन तारीख 31 ऑगस्ट


सर्व पीएम किसान (PM KISAN)लाभार्थ्यांसाठी ई-केवाय (eKYC) ची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. PM किसान (PMKISAN) मध्ये नोंदणीकृत शेतकरी बांधवांसाठी E-KYC अनिवार्य आहे. OTP आधारित eKYC PM किसान पोर्टलवर उपलब्ध आहे.


बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी कोणाला संपर्क कराल?


सरकारने नोटीसमध्ये म्हटले आहे की बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी, जवळच्या सीएससी (CSC centres, Common Service Centres)संपर्क साधावा लागेल. सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, जे शेतकरी लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे. ई-केवायसी पूर्ण करण्याचा कालावधी 1 सप्टेंबर 2022 पर्यंत आहे. 


ऑनलाईन प्रक्रिया अशी पूर्ण करा



  • PM किसान https://pmkisan.gov.in/ च्या अधिकृत वेबपेजला भेट द्या.

  • पेजच्या उजव्या बाजूला उपलब्ध असलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा.

  • आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड एंटर करा आणि सर्चवर क्लिक करा.

  • आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.

  • 'ओटीपी प्राप्त करा' आणि एंटर करा


नसल्यास, येथे संपर्क साधा


सर्व तपशील योग्यरित्या एंटर केल्यास आणि शिफारसीशी जुळल्यास, eKYC पूर्ण केले जाईल. ते पूर्ण न झाल्यास, ते अवैध म्हणून चिन्हांकित केले जाईल. असे झाल्यास संबंधित लाभार्थीने स्थानिक आधार सेवा केंद्राशी संपर्क साधावा. पीएम-किसान योजनेंतर्गत, सरकार प्रत्येक भूमिधर शेतकरी कुटुंबाला सरकारकडून दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये प्रति वर्ष एकूण 6000 रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करते. 31 मे रोजी, पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा 11 वा हप्ता जारी केला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या