PM Kisan Samman Nidhi Yojana : शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारनं विविध योजना सुरु केल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana). या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार (Central Govt) दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. हे हफ्ते चार महिन्यांच्या फरकाने दिले जातात. आत्तापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 16 हप्ते शेतकऱ्यांना दिले आहेत. लवकरच 17 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, हा हप्ता मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांना काही महत्वाची कामे पूर्ण करावी लागतील. या कामासाठी फक्त 11 दिवस शेतकऱ्यांकडे उरले आहेत.

  


शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही कामे पूर्ण करावीत


5 ते 20 जून याकाळात ईकेवायसी अपडेट करुन देण्यासह प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठीची प्रक्रिया या वेबसाइटवर सुरु आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ईकेवायसी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. सुरुवातीला या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावा. त्यानंतर पोर्टलवर जमिनीचा तपशील अपलोड करावा. त्यानंतर बँक खाते आधारशी लिंक करावे. ही महत्वाची चार कामे केल्यानंतरच तुम्हला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता मिळेल. दरम्यान, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 17 वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.


शेतकऱ्यांच्या आर्थिक पाठबळ देण्यासाठी 2019 मध्ये ही योजना सुरु


शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी 24 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली होती. पीएम किसान योजना शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करते. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये देते. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर 3 वेळा प्रत्येकी 2,000 रुपये पाठवले जातात.


कधी मिळणार 17 वा हप्ता? 


28 फेब्रुवारी 2024 रोजी, केंद्र सरकारने 16 वा हप्ता जारी केला होता. ज्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांचा हप्ता देण्यात आला होता. हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे पाठवले जात होते. प्रत्येक हप्ता चार महिन्यांच्या अंतराने येतो. अशा स्थितीत फेब्रुवारीपासून पुढील चार महिने जूनमध्ये संपत आहेत. मात्र, अधिकृतपणे हप्ता कधी जाहीर होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. मात्र, जूनच्या शेवटच्या आठवड्यात PM किसानचा 17 वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या:


PM किसानचा 17 वा हप्ता मिळण्यापूर्वी मोठी अपडेट, सरकारनं घेतला 'हा' निर्णय