PM Kisan Samman Nidhi: भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताच्या जीडीपीमध्ये शेतीचा वाटा 17 ते 18 टक्के आहे. अशा परिस्थितीत लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे 6 हजार रुपये 2 हजार रुपयांच्या तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. Direct Benefit Transfer योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात.


आतापर्यंत केंद्र सरकारने या योजनेचे 10 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. या योजनेचा 11 वा हप्ता एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या संबधित खात्यात अद्याप ई-केवायसी अपडेट केले नसेल, तर तुमच्या खात्यात 11व्या हप्त्याचे पैसे जमा होणार नाही. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही लवकरच पीएम किसान पोर्टलवर जाऊन तुमचे ई-केवायसी अपडेट करून घ्या. तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपच्या मदतीने ई-केवायसीची प्रक्रिया सहज पूर्ण करू शकतात. कसं ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ - 


PM Kisan Yojana मध्ये असे करा केवायसी: 



  • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, तुम्ही सर्वात आधी त्याच्या अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर क्लिक करा.

  • येथे तुम्ही या पोर्टलच्या होम पेजवर क्लिक करा.

  • येथे तुमच्या समोर एक टॅब उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला आधारची माहिती विचारली जाईल.

  • येथे आधार क्रमांक टाका.

  • त्यानंतर तुम्ही Search बटन दाबा. येथे तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर टाकण्याचा पर्याय उघडेल.

  • नंबर टाकल्यानंतर, नोंदणीकृत मोबाइल नंबरवर 4 अंकी OTP येईल.

  • त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर पुन्हा 6 अंकी OTP येईल.

  • हा OTP टाका.

  • त्यानंतर Submit बटण दाबा.

  • eKYC योग्यरितीने केल्यानंतर, तुम्हाला एक संदेश मिळेल की e-KYC योग्य प्रकारे केले गेले आहे. दुसरीकडे, केवायसी प्रक्रिया आधीच पूर्ण झाली असल्यास, ईकेवायसी आधीच पूर्ण झाली आहे, असा संदेश येईल.

  • जर Invalid चा मेसेज येत असेल तर, अशा परिस्थितीत तुमच्या आधारमधील कोणतीही माहिती चुकीची आहे.

  • आधी ही माहिती आधार केंद्रात दुरुस्त करा आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा संपूर्ण प्रक्रिया करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा.

  • ई-केवायसी केल्यानंतर, 2000 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यात सहजपणे जमा केला जाईल.