PM Kisan Next Instalment : पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याबद्दल शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते देण्यात आहेत. आता 19 वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. मात्र हा हप्ता नेमक्या कोणत्या तारखेला मिळणार याची मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. 


पीएम किसान योजनेमध्ये 4 महिन्यांच्या अंतराने एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. सरकारने ऑक्टोबर महिन्यात 18 वा हप्ता जमा केला होता. त्या हिशोबाने ऑक्टोबरनंतर फेब्रुवारीमध्ये 19 वा हप्ता देण्यात येण्याची शक्यता आहे. 


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे. भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. वर्षभरात तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होते. 


PM किसानचा हप्ता कसा चेक कराल?



  • पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in  वर जा.

  • ‘लाभार्थी स्थिती’ मुख्यपृष्ठावर जा, येथे लाभार्थी स्थिती टॅबवर क्लिक करा.

  • तुमचा तपशील एंटर करा, ज्यामध्ये तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक समाविष्ट आहे.

  • तपशील सबमिट केल्यानंतर, वेबसाइटवर तुमची हप्त्याची स्थिती दिसेल.


PM किसान योजनेसाठी कसा कराल अर्ज? 



  • सर्वप्रथम पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.

  • नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा

  • विचारलेल्या फॉर्ममध्ये आवश्यक तपशील जसे की आधार क्रमांक, राज्य, जिल्हा आणि इतर संबंधित वैयक्तिक आणि बँक माहिती प्रविष्ट करा.

  • फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट आउट घ्या.


PM किसान योजनेशी मोबाईल नंबर लिंक करा



  • तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जा. म्हणजे CSC किंवा https://pmkisan.gov.in  वर लॉग इन करा.

  • 'अपडेट मोबाइल नंबर' पर्याय निवडा.

  • शेतकरी बांधवांनो तुमचा मोबाईल नंबर दिल्यानंतर नोंदणीकृत आधार क्रमांक टाका आणि नवीन मोबाईल नंबर द्या.

  • यानंतर पडताळणीसाठी विनंती सबमिट करा.

  • अशा प्रकारे लाभार्थी त्यांच्या हप्त्याची स्थिती जाणून घेऊ शकतात.


ही बातमी वाचा: