Nashik Onion : नाशिक जिल्हयात यंदा चांगला पाऊस झाल्याने जिल्हयाच्या कांदा उत्पादक क्षेत्रात विक्रमी उन्हाळी कांद्याची लागवड झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ विक्रमी असल्याचं कृषी विभागाच्या आकडेवारी वरुन समोर आले आहे. सध्या लाल कांद्याला चांगला भाव मिळतोय त्यामुळे शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर उन्हाळी कांदयाला लागणारे पाणी उपल्बध आहे. त्यातच कृषी विभागाने उन्हाळी कांदा साठवणूकीसाठी कांदा चाळी उभारणीसाठी प्रोत्सहन देत असल्याने त्याचा फायदा साहजिकच शेतक-यांना होत आहे. नगदी पीक म्हणून शेतक-यांचा भर हा कांदा लागवडीसाठी असतो, त्यामुळे जे शेतकरी अन्य पीक घेऊ शकत नाही त्यांच्या साठी कांदा हेच मुख्य पिक असते. नाशिक जिल्हयात यंदा सर्वात जास्त लागवड (बागलाण) सटाणा तालूका आणि येवल्या तालूक्यात झाल्याच समोर आले असून मागील वर्षीच्या तुलनेत कांदा लागवडीचे क्षेत्रात वाढल झाली आहे. 

अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं.  अनेक भागात कांद्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. तर काही ठिकाणी अवकाळीचा फटका कमी बसला, त्यामुळे सध्या नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नाशिकमध्ये उन्हाळी कांदा जास्त येण्याची शक्यता आहे. यंदा सर्वात जास्त लागवड (बागलाण) सटाणा तालूका आणि येवल्या तालूक्यात झाल्याच समोर आले आहे. पाहूयात नाशिकमध्ये कोणत्या भागात किती कांदा उत्पन्न होणार आहे. 

चालू वर्षाची आकडेवारी हेक्टरमध्येमालेगाव- 36874  हेक्टकसटाणा- 54000 हेक्टरनिफाड-(पिंपळगाव, लासलगाव)- 15246.65 हेक्टरयेवला- 50495  हेक्टरचांदवड- 40926  हेक्टरकळवण- 2157 हेक्टरदेवळा- 26825  हेक्टरनांदगाव- 13533 हेक्टरदिंडोरी- 2363हेक्टरसिन्नर- 6743 हेक्टर

अन्य तालूक्यात मात्र लागवडीचे क्षेत्र कमी असले तरी यात अजूनही काही ठिकाणी कांदा लागवड होत असल्याने कांद्याच क्षेत्र वाढणार आहे.जानेवारी अखेर तीन लाख 95 हजार 156 हेक्टरवर उन्हाळी कांद्याची आता पर्यत लागवड झाली असून मागिल वर्षीच्या तुलनेत 20 ते 25 टक्के लागवडीचे क्षेत्र वाढल्याने यंदा उन्हाळी कांद्याच चांगल उत्पादन येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.