MP Heena Gavit : देशातील सर्वात मोठा केळी आणि पपई उत्पादक भाग म्हणून उत्तर महाराष्ट्राची ओळख आहे. या केळी आणि पपई हबमध्ये शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षापासून वातावरण बदलाचा मोठा फटका सहन करावा लागत होता. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाच्या वतीने हवामान बदलावर आधारित पिक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. त्याचा सर्वाधिक फायदा पपई आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती खासदार डॉ हिना गावित (MP Heena Gavit) यांनी दिली आहे.


नंदुरबार जिल्ह्यातील 1800 शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी


केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित पिक विमा योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन खासदार डॉ. हिना गावित यांनी केलं आहे. अचानक तापमानात होणाऱ्या वाढीचा परिणाम केळी आणि पपईच्या बागांमध्ये दिसून येत असतो. याचा परिणाम फळे खराब होऊन उत्पादन कमी होण्यात होतो. तापमानात झालेली वाढ आणि घट बागायतदार शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असल्याने केंद्र शासनाच्या वतीने हवामानावर आधारित पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचा सर्वाधिक फायदा केळी आणि पपई उत्पादकांना होणार असल्याचे गावित म्हणाल्या. नंदुरबार जिल्ह्यातील 1800 शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्यात आले असून उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आहवान नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित यांनी केले आहे.


पीक विमा योजनेची उद्दिष्टे कोणती? 


प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शासनाने हवामानावर आधारित फळपिक योजना सुरु केली आहे. या अंतर्गत आंबा, काजू, केळी या फळ पिकांचा समावेश आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्‍यांसाठी सक्तीची असून बिगर कर्जदार शेतकऱ्‍यांना ऐच्छिक आहे. कमी/ जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता, वेगाचे व गारपीट यापासून आंबा, काजू व केळी या फळपिकांना निर्धारित कालावधी विमा संरक्षण व आर्थिक सहाय्य देणे. नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्‍यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. ही या योजनेची उद्दिष्टे आहेत. या योजनेचा सर्वाधिक फायदा पपई आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळं सर्व शेतककऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन नंदुरबार लोकसभेच्या खासदार डॉ हिना गावित (MP Heena Gavit) यांनी केलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Ravikant Tupkar : शेतकऱ्यांची थट्टा कराल तर याद राखा, तुमची कार्यालये ठिकाणावर ठेवणार नाही, तुपकरांचा पीकविमा कंपन्यांना इशारा