Narendra Singh Tomar : भारतीय शेतीच्या विकासात कृषि विज्ञान केंद्रांची भुमिका महत्त्वाची असल्याचे वक्तव्य केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर (Minister Narendra Singh Tomar) यांनी केले. भारतीय कृषी अनुसंधान परिषदे अंतर्गत अटारी पुणे (Pune) कार्यालयाचे उद्‌घाटन नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. देशात सध्या 783 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत झाले आहे. सध्याच्या बदलत्या हवामानाच्या (Climate change) पार्श्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्रातील (Krishi Vigyan Kendra) शास्त्रज्ञ आपली महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनं या संदर्भात अनेक हवामान अनुकूल वाण विकसीत केल्याचे तोमर म्हणाले.  

Minister Narendra Singh Tomar : भारत आता मागणारा नाही तर देणारा देश 

कोरोना (corona) काळातसुद्धा कृषी क्षेत्राचे काम उल्लेखनीय राहिले आहे. भारत (india) आता मागणारा नाही तर देणारा देश झाला आहे. भविष्यात कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांना अधिक जबाबदारीने काम करावं लागेल असेही तोमर म्हणाले. यावेळी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी (Kailash Choudhary), भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महानिदेशक (कृषि विस्तार) डॉ. व्ही. पी. चहल, महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग यांची उपस्थिती होती. 

Kailash Choudhary : नैसर्गिक शेती आणि पौष्टिक तृणधान्ये वाढीकडे लक्ष देण्याची गरज : राज्यमंत्री कैलाश चौधरी

देशाला सध्या नैसर्गिक शेती (Natural Farming) आणि पौष्टिक तृणधान्ये वाढीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे वक्तव्य कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कृषी क्षेत्राच्या पायाभूत विकासाच्या बाबतीत सकारात्मक असून कृषी विज्ञान केंद्राचे कृषी क्षेत्रातील योगदान पाहता भविष्यात कृषी विज्ञान केंद्रांना अधिक बळकट करणे आवश्यक असल्याचे चौधरी म्हणाले.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद

  • ICAR ही भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभागांतर्गत एक स्वायत्त संस्था आहे.
  • या संस्थेची स्थापना 16 जुलै 1929 रोजी इम्पीरियल कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च या नावाने झाली.
  • ही परिषद देशातील फलोत्पादन, मत्स्यपालन आणि प्राणी विज्ञान यासह कृषी क्षेत्रातील संशोधन आणि शिक्षणाचे समन्वय, मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करणारी सर्वोच्च संस्था आहे.
  • भारतीय कृषी संशोधन परिषदेने देशात हरित क्रांती घडवून आणल्यानंतर संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाद्वारे देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासात आघाडीची भूमिका बजावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Narendra Singh Tomar : 2021-22 मध्ये शेतकऱ्यांकडून 2.75 लाख कोटी रुपयांच्या शेतमालाची खरेदी, कृषीमंत्री तोमर यांची माहिती