Marathwada Kharif season : सध्या राज्यात सर्वत्र पावसानं (Rain) दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यात (Marathwada) पावसाने दडी मारल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील खरिपाची (Kharif) उत्पादन क्षमता सरासरी 35 ते 40 टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. पुढील आठ दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास 35 लाख हेक्टरवरील संपूर्ण खरीप धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे 


पावसाअभावी मराठवाड्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पिकांना पाण्याची गरज आहे. मात्रस सध्या पाऊस पडत नसल्यानं पीकं धोक्यात आली आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. 
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीपाच्या पिकांची पेरणी केली आहे.  बऱ्यापैकी क्षेत्र हे पावसावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या 15 दिवसाहून अधिक काळ झालं राज्यात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरलेली पीकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


मराठवाड्यातील खरीप हंगामातील पीक पेरणीचे क्षेत्र 


छत्रपती संभाजीनगर -  68  लाख 4 हजार 716 


जालना - 6 लाख 19 हजार 695 


बीड - 7 लाख 85 हजार 786 


लातूर - 5 लाख 99 हजार 456 


धाराशिव - 5 लाख 4 हजार 735 


नांदेड - 7 लाख 66 हजार 809 


परभणी - 5 लाख 34 हजार 900 


हिंगोली - 36 हजार 905


51 वर्षांनी पावसाने घेतला एवढा मोठा ब्रेक


जून आणि जुलै महिन्यात बऱ्यापैकी चांगला पाऊस पडला. ज्यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावला. मात्र ऑगस्टमध्ये पावसाने चांगलाच ब्रेक घेतला आहे. त्यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. तब्बल 51 वर्षांनी पावसाने एवढा मोठा ब्रेक घेतल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. यापूर्वी 1972 मध्ये 18  जुलै ते 3 ऑगस्ट इतका ब्रेक बघायला मिळाला होता. मान्सून ब्रेक हे सर्वसाधारण आहेत. सध्या 8 ते 10 दिवसांचा ब्रेक पाऊस घेत आहे. मान्सूनमध्ये असे ब्रेक येत असतात आणि ते शेतीसाठी गरजेचे असतात. पण यावेळेस पाऊसच कमी पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता वाटणे साहजिक असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. 


दरवर्षीच्या सरासरीपेक्षा यंदा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे मान्सूनची आकडेवारीत मोठा फरक जाणवला आहे. यापूढे पावसाची काही प्रमाणात शक्यता आहे. हा ड्राय स्पेल सध्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आणि पश्चिम विदर्भात बघायला मिळेल. 18 ऑगस्टनंतर मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 19 आणि 20 ऑगस्टला विदर्भात  काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


kharif crop : खरीप पिकांच्या लागवडीत वाढ, कृषी मंत्रालयानं दिली माहिती; भात लागवडीत मोठी वाढ होऊनही निर्यातबंदी