मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Rain News) तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. कणकवली, कुडाळ सावंतवाडीसह जिल्ह्याच्या इतरही भागात पाऊस सुरू असून काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच मुसळधार पावसाचा इशारा देखील दिला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, रत्नागिरीतही पावसाची जोरदार बँटींग सुरु आहे. रत्नागिरीसह जिल्ह्यातील इतर भागात जोरदार पावसाच्या सरी


पावसामुळे बळीराजा सुखावला


बारामती तालुक्यातील कन्हेरी गावात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची तारांबळ उडाली आहे. बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं. त्यामुळे नागरिकांना अचानक आलेल्या पावसामुळे काय करावे आणि काय नको अशी अवस्था येथील ग्रामस्थांची झाली होती. बारामतीतील याच कन्हेरी गावात जागृत हनुमान मंदिर आहे, पवार कुटुंबीय आपल्या प्रचाराचा शुभारंभ याच मंदिरातून करत असतात. 


हळद, सोयाबीनसह कापसाच्या लागवडीचे काम सुरू 


पावसानंतर हिंगोली जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये परवा जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्यानंतर शेतामध्ये पेरणीच्या कामाला वेग आला आहे. हळद सोयाबीन कापूस या पिकांच्या लागवडीसह पेरणीचे काम शेतामध्ये सुरू आहेत. यावर्षी हळदीला चांगला भाव मिळाल्यानंतर हळदीच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. हळद, कापूस आणि सोयाबीन या पिकांचे गतवर्षीपेक्षा यावर्षी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.


नदीला पूर आल्याने नागरिकांचा जीवघेणा प्रवास


बीडच्या माजलगांव तालुक्यातील कोथाळा येथील सरस्वती नदीला पूर आल्याने नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. कोथाळा आणि सिरसाळा गावाचा संपर्क तुटला आहे. मागील तीन दिवसापासून मान्सूनचं आगमन झालं. मंगळवारी रात्री तालुका परिसरात दमदार संततधार पाऊस झाल्याने माजलगांव तालुक्यातील कोथाळा येथील सरस्वती नदीला पूर आल्याने नागरिकांना जीवघेणा करावा लागत आहे. कोथाळा येथील सरस्वती नदीला पाऊसामुळे पुर आल्याने पूलावरुन पाणी वाहत असल्याने सिरसाळ्याला जाणारा रस्ता बंद झाला आहे. यावर्षी चांगला पाऊस पडण्याची अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला असून मागील तीन ते चार दिवसांपासून पाऊसाला सुरुवात झालेली आहे.