Maharashtra Rain : राज्यात मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस होताना दिसत आहे. मुंबई आणि परिसरात चांगलाच पाऊस झाला. तसेच राज्याच्या इतरही भागात पावसानं दरदार हजेरी लावली आहे. राज्यातील मुंबईसह पुणे, कोल्हापूर, सांगली यवतमाळ, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया या भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच शेतीकामांना वेग आला आहे.
राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हेजरी लावली आहे. या पवासामुळं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पावसामुळं पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर पावसाचं आगमन झाल्यानं शेतकरी आनंदी आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर कृषी विद्यापीठ आणि कृषी तज्ज्ञांनाकडून याबाबत सल्ला मिळाला आहे. 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.
हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस
खरीप हंगाम सुरु होण्याअगोदर हिंगोली शहरासह ग्रामीण भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली. चातकाप्रमाणे या पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी वर्गात मोठे आनंदाचे वातावरण आहे जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले आहे मृग नक्षत्राच्या नंतर आजचा झालेला हा पहिला जोरदार पाऊस मानला जातोय या पावसाचा शेताच्या बांधावर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी
सांगलीतही पावसाची बटिंग
पावसाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. सांगली शहरासह परिसात पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. या पावसामुळं शेतीकामांना वेग येणार आहे. चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
यवतमाळमध्ये वीज पडून युवतीचा मृत्यू, पाच जण जखमी
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात इनापुर शेतशिवारात वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. परिसरातील शेत शिवारात पडलेल्या जोरदार पावसामुळं शेतीकामांना चांगलाच वेग आला आहे. मात्र, पुसद तालुक्यातील एका 15 वर्षीय युवतीचा वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. पल्लवी दिलीप चव्हाण (15) (रा.इनापूर) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. तर रविना अनिल चव्हाण (16), आरती सुनिल चव्हाण (16)( रा. इनापूर) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शांताबाई धर्मा चव्हाण (65), देवराव कनीराम चव्हाण (58), रेखा मधुकर राठोड हे तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
खरीप हंगामात आदिवासी बांधवांचे नुकसान, 2 बैलांचा मृत्यू
मारेगाव तालुक्यातील सालईपोड (खंडणी) येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. लक्ष्मण चंदकू टेकाम (53) या आदिवासी शेतकऱ्याचे हे दोन बैल होते. गावालगत असलेल्या गोठ्यावर वीज पडल्यानं बैलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ऐन खरीप हंगामाच्या कामाला सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांची बैलजोडी ठार जाली. त्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बैलजोडी दगावल्याने शेती करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे.
चंद्रपूरमध्ये वीज कोसळून मुलीचा मृत्यू
कापूस पेरणीसाठी शेतात गेलेल्या मुलीचा वीज कोसळल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली. गौरी कोडापे (16), कोरपना तालुक्यातील बेलगाव येथे ही घटना घडली आहे. ही मुलगी मामाच्या शेतात पेरणीसाठी गेली होती. त्यावेळी घटना घडली. या घटनेत इतर 5 लोक झाले जखमी झाले आहेत.
गोंदियामध्ये पावसाचं आगमन
गोंदिया जिल्हामध्ये अनेक ठिकाणी पावसाचं जोरदार आगमन झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सून जिल्हामध्ये हुलकावणी देत होता. मात्र, अचानक मान्सूनपूर्व पावसाच्या सरीचं जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आगमन झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एकीकडे शेतकरी जमिनीची मशागतीसाठी पावसाची वाट पाहत असताना अचानक आलेल्या पावसानं काहीसा दिलासा मिळणार आहे. अद्यापही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा सरीच्या आगमनाची प्रतीक्षा कायम आहे.
महत्वाच्या बातम्या: