Swabhimani Shetkari Sanghatana Protest Live Updates : रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम, हजारो शेतकऱ्यांसह मुंबईच्या वेशीवर दाखल

जलसमाधी आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह हजारो शेतकऱ्यांचा ताफा मुंबईच्या वेशीवर दाखल झाला आहे.

abp majha web team Last Updated: 24 Nov 2022 11:16 AM

पार्श्वभूमी

 Swabhimani Shetkari Sanghatana Protest Live Update : शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही. काहीही झालं तरी आज जलसमाधी आंदोलन होणारच असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani...More

शेतकऱ्यांच्या पदरात काही ना काही पाडून दिल्याशिवाय मैदान सोडणार नाही : रविकांत तुपकर

Ravikant Tupkar : तुमच्या पदरात काही ना काही पाडून दिल्याशिवाय मी मैदान सोडणार नसल्याचे रविकांत तुपकर म्हणाले. तुम्ही परवानगी द्या, मी तसा येणार नसल्याचे तुरकर म्हणाले. आपल्या मागण्यांचा निर्णय लागेपर्यंत मुंबई सोडायची नाही असेही तुपकर म्हणाले.